T20 World Cup : दुखापतीचे ग्रहण काही सुटेना! बुमराहचा 'बॅकअप प्लॅन' देखील फेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Chahar

T20 World Cup : दुखापतीचे ग्रहण काही सुटेना! बुमराहचा 'बॅकअप प्लॅन' देखील फेल

Deepak Chahar T20 World Cup Ruled Out : विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला लागलेले दुखापतीचे ग्रहण काही सुटेना झालं आहे. बुमराहचा बॅकअप प्लॅन देखील फेल झाला असे दिसत आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडला. त्यानंतर दीपक चहर बॅकअप प्लॅनसाठी तयार करत होता पण त्यांच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी समोर आली आहे कारण तो चहर या स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

दीपक चहरच्या पायाचा घोटा दुखावला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाहीय. आता अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर संघात सामील होतील.

हेही वाचा: Sourav Ganguly : दादाला BJP मध्ये न जाणं भोवलं? BCCI मधून मिळाला डच्चू; TMC कडून हल्लाबोल

जसप्रीत बुमराहच्या जागी चहरला किंवा मोहम्मद शमीला मुख्य संघात घेण्याची चर्चा होती. आता चहर दुखापतीमुळे या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे. लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा चेतन साकारिया नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियातील टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मोहम्मद शमीनेही फिटनेस टेस्ट पास केली आहे. बुमराहऐवजी त्याची मुख्य संघात निवड केली जाईल.

हेही वाचा: Mohammed Siraj : शमी एकटाच नाही तर सिराज, शार्दुलही जाणार ऑस्ट्रेलियाला

T20 विश्वचषकासाठी सर्व संघ:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर (चहरचे नाव अद्याप अधिकृतपणे काढलेले नाही).