चहरला फिट होण्यासाठी आणखी पाच आठवडे तर वॉशिंग्टन...

Deepak Chahar
Deepak Chahar
Updated on

बंगळूर : भारताचा T20 स्पेशालिस्ट अष्टपैलू खेळाडू दीपक चहर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामातून बाहेर पडला होता. आता या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला आणखी चार ते पाच आठवडे लागणार आहे. दीपक चहर याचे वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेने टीम इंडियाच्या संघात पुनरागमन होते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेदरम्यान चहरला दुखापत झाली होती.

Deepak Chahar
Wimbledon 2022: जोकोविचला विम्बल्डनमध्ये अव्वल मानांकन

चहर सध्या बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार घेत आहे. चहर या वेळी म्हणाला, दुखापतीवरील उपचार व्यवस्थित सुरू आहेत. सध्या सलग चार ते पाच षटके गोलंदाजी करू शकत आहे. सामन्याला लागणारा फिटनेस मिळवण्यासाठी आणखी चार ते पाच आठवडे लागू शकतील, असे त्याने नमूद केले.

स्थानिक सामने खेळणार

चहरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेपर्यत तंदुरुस्त होईन असे संकेत दिले आहेत. बरा झाल्यानंतरही मला क्लब स्तरावरील क्रिकेट खेळावे लागणार आहे, असे त्याने सांगितले.

Deepak Chahar
Shikhar Dhawan: धवनसाठी टी-20 वर्ल्डकपचे ‘शिखर’ दूरच

२९ वर्षीय चहर आणि वॉशिंग्टन सुंदर हाताच्या दुखापतीतून बरे होत आहेत. या दोन्ही खेळाडूंचे टी नटराजन यांच्यासह राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे पुनर्वसन सुरू आहे. 22 वर्षीय फिरकी अष्टपैलू खेळाडू इंग्लंडच्या काउंटी संघ लँकेशायरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com