हनिमुननंतर दीपक चहरने सुरू केली प्रॅक्टिस- VIDEO

दीपक चहरने अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत आग्रा येथे लग्न केले
Deepak Chahar Training After Wedding
Deepak Chahar Training After Wedding
Updated on

Deepak Chahar Training After Wedding : भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहरने अलीकडेच त्याच्या गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत विवाहबंधनात अडकला आहे. दीपक आणि जया गेल्या अनेक दिवसापासून हे एकमेकांना डेट करत होते. आग्रा येथे जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. लग्नानंतर दीपक आणि जया त्यांच्या हनीमूनला जाऊन परत आले आहेत. त्यानंतर दीपक चहरने पुन्हा एकदा आपल्या सरावला सुरूवात केली आहे.

Deepak Chahar Training After Wedding
मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती; स्वप्न राहिले अधुरे

दीपक चहर गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याने फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्या सामन्यामध्ये त्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे तो श्रीलंका मालिका आणि आयपीएल 2022 मध्ये खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे प्रशिक्षण घेतले होत. दीपक चहरने अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत आग्रा येथे लग्न केले. ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार्स दिसले.

Deepak Chahar Training After Wedding
मिताली राजने निवृत्ती घेतानाच दिले 'सेकंड इंनिंग'चे संकेत

लग्न आणि त्यानंतर रिसेप्शन आटोपल्यानंतर दीपकने पूर्ण फिटनेस साधण्यासाठी पुन्हा प्रशिक्षण सुरू केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ स्टोरी ठेवली आहे. ज्यामध्ये तो नेटवर फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. 'बैक टू वर्क।' असे व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे. चहर टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग नव्हता. आयपीएल 2022 च्या लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र दुखापतीमुळे तो या स्पर्धेत खेळू शकला नाही. दुखापतीनंतर आता पूर्ण तंदुरुस्ती होऊन टी-20 विश्वचषका 2022 साठी संघ येण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Thailand Open
Sports News
Vinesh Phogat
Shreyas Iyer
Marathi News Esakal
www.esakal.com