वाऱ्याचा वेग जास्त होता - दीपिका कुमारी

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

रिओ - तिरंदाजीत रशियाकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाबद्दल भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने वाऱ्याचा वेगाला दोष देत, वाऱ्याच्या वेगामुळे आमची उपकरणे उडत असल्याचे म्हटले आहे.

सांबरड्रोम येथील रेंजवर झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत दीपिका कुमारी, बॉम्बयला देवी आणि लक्ष्मीराणी माझी या भारतीय महिला तिरंदाजी संघाला उपांत्यपूर्वफेरीत रशियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत कोलंबियाविरुद्धची उपउपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकून भारतीय महिला तिरंदाजी संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. पण, रशियाकडून भारताला शूट ऑफमध्ये 5-4 असा पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवानंतर बोलताना दीपिका कुमारी म्हणाली की, आम्ही आमची सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, पण अशा प्रकारे पराभवाला सामोरे जाणे निराशाजनक होते. आम्ही आत्मविश्वासाने वेध साधला मात्र महत्त्वपूर्ण गुण घेण्यात अपयशी ठरलो. आजचा दिवस आमचा नव्हता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत कोणताही संघ जिंकू शकत होता. पराभव सहन करणे अवघड आहे. हवेमुळे आमची उपकरणे उडत होती. त्यामुळे लक्ष्याचा वेध घेण कठीण होते.

Web Title: Deepika Kumari blames it on wind