Deepti Sharma : वॉर्निंग देऊनच 'मंकडिंग', अखेर वादावर दिप्ती बोललीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepti Sharma Says gave warnings to Charlie Dean

Deepti Sharma : वॉर्निंग देऊनच 'मंकडिंग', अखेर वादावर दिप्ती बोललीच

Deepti Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने शेवटची विकेट मंकडिंग करून काढली. यामुळे भारताने सामना 16 धावांनी जिंकला आणि इंग्लंडला ऐतिहासिक व्हाईट वॉश दिला. दिप्ती शर्माने नॉन स्ट्राईकरवर असलेल्या चार्ली डीनला चेंडू टाकण्यापूर्वीच धाव घेण्यासाठी क्रीज सोडल्यानंतर धावबाद केले. यामुळे वाद निर्माण झाला आहे. अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी यावर आपले मत व्यक्त केले. असं करणं खिलाडू वृत्तीला धरून आहे की नाही याबाबत पुन्हा एकदा चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान, ज्या दिप्ती शर्माने चार्लीला बाद केले तिनेच याबाबत खुसाला केला आहे. (Deepti Sharma Says gave warnings to Charlie Dean Multiple Time Then decided to run her out)

हेही वाचा: Sandeep Lamichhane : बलात्काराचा आरोप असलेल्या लामिछानेविरूद्ध इंटरपोलची नोटिस?

दिप्ती शर्मा म्हणाली की, 'आम्ही चार्लीला प्लॅन करून बाद केलं. कराण ती सारखी चेंडू टाकण्याआधीच क्रीज सोडत होती. आम्ही तिला वार्निंग दिली होती. आम्ही जे काही केलं ते नियमानुसारच केलं आहे.' दिप्ती शर्मा पुढे म्हणाली, 'आम्ही याबाबत पंचांना देखील सांगितलं होतं. मात्र तरी देखील ती क्रीज सोडतच होती. त्यामुळे आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.'

हेही वाचा: Axar Patel :आम्हाला वाटलं जडेजा नाही आता... खुद्द कांगारूंच्या प्रशिक्षकाने बापूची पाठ थोपटली

दरम्यान, इंग्लंडची कर्णधार हेथर नाईटने भारताने कोणतीही वॉर्निंग दिली नव्हती त्यांनी खोटं बोलू नये असे वक्तव्य केलं आहे. हेथर भारताविरूद्धची मालिका खेळत नाहीये. हेथरने ट्विट केले की, 'सामना संपला आहे. चार्लीला वैधरित्या बाद करण्यात आलं होतं. सामन्याचा आणि मालिकेचा विजेता होण्याचा भारत हक्कदार आहे. मात्र कोणत्याही प्रकारची वॉर्निंग देण्यात आली नव्हती. त्यांना देण्याची गरज देखील नव्हती. त्यामुळे चार्लीला मंकडिंग पद्धतीने बाद करणं हे इतर प्रकारे बाद करण्याइतकंच वैध आहे.'