Australian Open : राफेल नदाल ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

नदालचा या पराभवामुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.
rafael nadal
rafael nadalSakal

Rafael Nadal : गतविजेता राफेल नदाल दुसऱ्या फेरीत मॅकेन्झी मॅकडोनाल्डकडून पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडला आहे.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

नदालला ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डने नदालचा 6-4, 6-4, 7-5 असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. 

36 वर्षीय नदालला सामन्यादरम्यान पाठीच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. यामुळे त्याला काहीकाळ ब्रेकही घ्यावा लागला होता.

विश्रांतीनंतर नदाल पुन्हा कोर्टवर परतला होता. मात्र, खेळताना नदालची ती शैली चाहत्यांना दिसून आली नाही आणि त्याला पराभवाला सामोरे जावे लागले.

rafael nadal
Raj Thackeray : दंड ठोठावत परळी न्यायालयाकडून राज ठाकरेंबाबत मोठा निर्णय

रफाएल नदालने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब जिंकला होता. गेल्या स्पर्धेत नदालने अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनवर स्वतःचे नाव कोरले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com