State Level Kabaddi Tournament : पुरुष विभागात मुंबई शहर उपांत्य फेरीत ; महिला विभागात पुण्याची आगेकूच

पुरुष विभागात मुंबई शहरने, तर महिला विभागात पुण्याने छत्रपती शिवाजी महाराज चषक या महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ठाणे, परबवाडी येथे प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू आहे.
State Level Kabaddi Tournament
State Level Kabaddi Tournamentsakal

ठाणे : पुरुष विभागात मुंबई शहरने, तर महिला विभागात पुण्याने छत्रपती शिवाजी महाराज चषक या महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ठाणे, परबवाडी येथे प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू आहे. पुरुष विभागातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या मुंबई शहरने नंदुरबारचे आव्हान ४१-१७ असे संपुष्टात आणले. सुरुवातीची १० मिनिटे चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात पहिला लोण मुंबईने देत आघाडी घेतली. त्यानंतर हा सामना एकतर्फी झाला.

पूर्वार्धात १५-०८ अशी आघाडी मुंबईकडे होती. शेवटची पाच मिनिटे पुकारली तेव्हा ३१-१३ अशी मुंबईकडे आघाडी होती. उत्तरार्धात मुंबईने आणखी दोन लोण दिले. प्रणय राणे, विनोद अत्याळकर यांच्या झंझावाती चढाया अन् त्यांना सिद्धेश तटकरेंची मिळालेली पकडीची साथ यामुळे मुंबईने आपला विजय साकारला. संचित शिंदे, जयेश महाजन, दीपक शिंदे यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात दिसला नाही.

State Level Kabaddi Tournament
Pro Kabaddi : अस्लम इनामदारवर पुण्याची मदार ; प्रो कबड्डी, माजी विजेत्या पाटणाविरुद्ध आज उपांत्य सामना

महिला विभागातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या पुण्याने नांदेडचा ६४-२३ असा धुव्वा उडवत आपणच या स्पर्धेचे दावेदार हे दाखवून दिले. पूर्वार्धात तीन लोण देत ३७-११ अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याने उत्तरार्धातदेखील त्याच तडफेने खेळ करीत आणखी दोन लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. आम्रपाली गलांडेचा झंझावात नांदेडला रोखणे जमले नाही. तिला चढाईत मंदिरा कोमकर, तर पकडीत दिव्या गोगावले, रेखा सावंत यांची मोलाची साथ लाभली. नांदेडच्या सानिका पाटील, सायली पाटील यांचा खेळ या सामन्यात बहरला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com