FIFA WC22 : हॅरी केनचा पेनल्टीवर गोल चुकला अन् इंग्लंड बाहेर! फ्रान्स थाटात उपांत्य फेरीत

आपण विश्वविजेते का आहोत, याचा वस्तुपाठच आज फ्रान्सने इंग्लंडला घालून दिला.
FIFA World Cup 2022 Quarter England vs France
FIFA World Cup 2022 Quarter England vs France

FIFA World Cup 2022 Quarter England vs France : आपण विश्वविजेते का आहोत, याचा वस्तुपाठच आज फ्रान्सने इंग्लंडला घालून दिला. उपउपांत्य फेरीत त्यांनी इंग्लंडवर २-१ अशी मात करीत उपांत्य फेरीत धडक मारली. आता त्यांची लढत मोरोक्कोशी होणार आहे. फ्रान्सकडून ऑरेलियन त्वौमेनी, गिरॉर्ड यांनी गोल केले. इंग्लंडकडून कर्णधार हरी केन याने पेनल्टीवर एक गोल केला तर उत्तरार्धात मिळालेल्या दुसन्या पेनल्टीवर तो गोल करू शकला नाही. हाच फरक इंग्लंडचा प्रवास थांबविणारा ठरला.

FIFA World Cup 2022 Quarter England vs France
Cristiano Ronaldo : नेमारप्रमाणे रोनाल्डोचा स्वप्नभंग; मोरोक्कोने पोर्तुगालचा पराभव करत रचला इतिहास

फ्रान्सने अगदी १७ व्या मिनिटाला आघाडी घेत झकास सुरुवात केली. हा गोल अतिशय अफलातून होता. त्याचे श्रेय निश्चितच ऑरेलियन त्वौमेनीला जाते. इंग्लंडवर हे प्रतिआक्रमण होते. एम्बापेने डी दिशेने जलद धाव घेत डाव्या बगलेतून प्रोजमनकडे पास दिला. त्याने तो त्वौमेनीलाकडे सोपविला. तयारीत असलेल्या त्वामेनीने ३० यार्डावरून अफलातून गोल केला. त्या वेळी इंग्लंडच्या गोलरक्षकाला बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली. इंग्लंडचा साका आणि काने, तर फ्रान्सच्या एम्पावेची जलद आक्रमणामुळे पाठीराख्यांचा उत्साह वाढवत होते.

FIFA World Cup 2022 Quarter England vs France
Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डो क्वार्टर फायनलमध्येही बेंचवरच

उत्तरार्धाची सुरुवात अधिक गतीची होती. ५० व्या मिनिटाला साका चेंडू घेऊन उजव्या बगलेतून आला. तो उत्तम ड्रिबलिंग करीत गोलपोस्टच्या दिशेने जात असताना त्वौमेनीने त्याला अवैधरीत्या रोख. त्याक्षणी पंचांनी इंग्लंडला पेनल्टी बहाल केली. ५४ व्या मिनिटालाइंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने ही संधी साधत सामना १-१ अशा बरोबरीत आणला. त्यानंतर पुन्हा फ्रान्सने प्रतिआक्रमण केले. याचा पाया एम्बापेने घातला.

डाव्या बगलेतून तो चेंडूसह सुसाट धावत सुटला. क्षणार्धात तो डीच्या जवळपास आला. त्याने अगदी श्वास रोखून धरायला लावणारा क्रांस पास टाकला. ही फ्रान्सला पुन्हा आघाडीची घेण्याची मोठी संधी होती. मात्र, डेवेलेला चेंडूवर नियंत्रण न मिळविता आल्याने ती वाया गेली. एम्बापेने पुन्हा एकदा पुढच्या मिनिटाला डाव्या बगलेतून भन्नाट क्रॉस टाकला. डी मध्ये खेळताना उंचावरून आलेल्या पासवर गिरॉर्डने अफलातून हेडरद्वारे फ्रान्सला पुन्हा २-१ असे आघाडीवर नेले. कर्णधार केनला पुन्हा पेनल्टीच्या रूपाने ८४ व्या मिनिटास संधी मिळाली; पण तो अयशस्वी ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com