Dinesh Karthik : तमिळनाडूने वनडेत 506 धावा चोपल्या तरी कार्तिक का आहे नाखूष?

Dinesh Karthik Tamil Nadu Vijay Hazare Trophy
Dinesh Karthik Tamil Nadu Vijay Hazare Trophy esakal

Dinesh Karthik Tamil Nadu Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीत आज (दि. 21) तमिळनाडूने अरूणाचल प्रदेश विरूद्ध 506 धावा उभारत विश्वविक्रम केला. आतापर्यंत कोणत्याही संघाला लिस्ट A सामन्यात एवढी धावसख्या उभारता आलेली नाही. मात्र तमिळनाडूच्या या दमदार कामगिरीनंतरही तामिळनाडूचाच अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक नाराज आहे. सध्या दिनेश कार्तिकने केलेले ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अर्थात दिनेश कार्तिक साई सुदर्शन आणि एन जगदीशन यांचे अभिनंदन करण्यास विसरला नाही.

Dinesh Karthik Tamil Nadu Vijay Hazare Trophy
Vijay Hazare Trophy : तमिळनाडूच्या सलामी जोडीने चोपल्या 416 धावा; दिग्गज गेल - सॅम्युअल्सचे मोडले रेकॉर्ड

तमिळनाडूने अवाढव्य विक्रमी धावसंखा उभारल्यानंतर दिनेश कार्तिकने ट्विट केले. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'वर्ल्ड रेकॉर्ड अलर्ट! जगदीशन चांगला प्रयत्न होता. मोठ्या गोष्टी त्याची वाट पाहत आहेत. साई सुदर्शनसाठी देखील स्पर्धा चांगली गेली.' तमिळनाडूच्या सलामीवीरांचे कौतुक केल्यानंतर कार्तिकने वर्मावर बोट ठेवलं. तो आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणाला की, 'सामन्याची दुसरी बाजू देखील आहे. लीग स्टेजमध्ये अरूणाचल प्रदेश सारख्या संघाला एलिट संघासोबत खेळवावे का? यामुळे संघांचा फक्त रन रेट खाली येतो. तुम्ही विचार करा जर यामधील कोणत्याही संघाविरूद्धच्या सामन्यात पाऊस आला तर काय होईल. अरूणाचल प्रदेश सारख्या संघांचा वेगळा ग्रुप होऊ शकत नाही का तेथून ते एलिट संघासोबत खेळण्यासाठी पात्र होतील?'

दिनेश कार्तिकने आपल्या ट्विटद्वारे देशांतर्गत क्रिकेटमधील वर्मावर बोट ठेवले. दिनेश कार्तिकने ज्या मुद्द्याला हात घातला आहे तो मुद्दा अगदी वैध आहे. विजय हजारे ट्रॉफीत 38 संघ खेळतात. या संघांना पाच ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये नॉर्थइस्टच्या एका संघाचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी एकाही संघाने आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com