Team India : वर्ल्डकपमध्ये चहलला बेंचवरच का बसवलं; संघातीलच खेळाडू म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yuzvendra Chahal Team India

Team India : वर्ल्डकपमध्ये चहलला बेंचवरच का बसवलं; संघातीलच खेळाडू म्हणाला...

Yuzvendra Chahal Team India : टी-20 विश्वचषक-2022 मध्ये भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या संघात त्याला स्थान मिळाले पण तो संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसुन राहिला. उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर काही क्रिकेटप्रेमींना असे वाटले की, जर चहल अॅडलेडमध्ये खेळणाऱ्या संघाचा भाग असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. आता चहल न्यूझीलंडमधील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी टीम इंडियासोबत आहे.

अनुभवी यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने क्रिकबझशी संवाद साधताना सांगितले की, 'चहल आणि हर्षल पटेल हे दोघेही असे खेळाडू आहेत ज्यांनी स्पर्धेत एकही सामना खेळला नाही, पण ते दु:खी नव्हते. ते नाराज पण नव्हते. स्पर्धेच्या सुरुवातीला त्यांना सांगण्यात आले होते की, काही अटींवर आम्ही तुम्हाला घेत नाही, अन्यथा आमच्यासाठी कठीण होईल. त्यामुळे त्यांना जाणीव होती आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा ते आपले सर्वोत्तम देऊ शकतील अशा पद्धतीने ते तयारी करत होते. कार्तिक पुढे म्हणाला, 'मला वाटते की जेव्हा प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या बाजूने सर्वकाही स्पष्ट होते, तेव्हा एक खेळाडू म्हणून तुमचे काम खूप सोपे होते. तुम्हाला काय करायचे आहे.

टी-20 विश्वचषकातील पराभवानंतर टीम इंडिया आता न्यूझीलंड दौऱ्यावर आहे जिथे त्यांना 3-3 सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना पावसामुळे नाणेफेक न होता रद्द करण्यात आला होता. या मालिकेत टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे आहे तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पंतच्या चाहत्यांना आशा आहे की, हार्दिक या मालिकेत त्यांच्या आवडत्या खेळाडूला नक्कीच संधी देईल.