धोनी, हार्दिक पांड्याच्या अभिनयाची होतेय चर्चा

वृत्तसंस्था
सोमवार, 31 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर एम. एस. धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. आता त्यांनी स्टार नेटवर्कची जाहिरात केली. त्यांची ही जाहिरात चांगलीच गाजत आहे. काहींकडून या जाहिरातीचे कौतुक केले जात आहे. तर ही जाहिरात 'एफर्टलेस' असल्याचे काहीजणांकडून सांगितले जात आहे. 

एम. एस. धोनी आणि हार्दिक पांड्या यांची ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर या दोघांच्या क्रिकेटमधील निवृत्ती झाल्यानंतर त्यांच्यासमोर जाहिरातीचा हा पर्याय चांगला असल्याचे सांगितले जात आहे. या दोन क्रिकेटरचा परफॉर्मन्स जाहिरातीमधून दिसत आहे. त्यांच्या फॅन्सने या जाहिरातीनंतर त्यांचे बॉलीवूडमध्ये यशस्वी करिअर होईल, असे ट्विट केले. तसेच त्यांच्या अनेक चाहत्यांनी या जाहिरातीनंतर शुभेच्छाही दिल्या आहेत. एम. एस. धोनी आणि हार्दिक पांड्या या दोघांच्या जाहिरातीची सध्या एकच चर्चा सुरु आहे. 

Web Title: Discussion about Dhoni and Hardik Pandyas acting in Advertisement