
नागपूर, ता. २८ : कोणत्याही खेळात उंच शिखर गाठायचे असेल तर, त्या खेळाडूच्या डोळ्यासमोर एक निश्चित ध्येय असणे गरजेचे आहे. याशिवाय त्याच्यात जिद्द, चिकाटी, समर्पणवृत्ती, फोकस, कठोर परिश्रम, तपस्या, संयम, सातत्यपूर्ण कामगिरी आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानणे, इत्यादी गुणही तितकेच आवश्यक आहे. हे सर्व गुण दिव्या देशमुखमध्ये ठासून भरले आहे. याच गुणवैशिष्ट्यांमुळे ती इतक्या कमी वयात ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनू शकली, असे स्पष्ट मत दिव्याचे प्रशिक्षक, मेंटॉर व माजी राष्ट्रीय बुद्धिबळपटू गुरप्रीतसिंग मरास यांनी व्यक्त केले.