Divya Deshmukh wins FIDE Women’s Chess World Cup 2025 : नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने सोमवारी इतिहास घडवला आहे. जॉर्जिया येथे झालेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत तिने विजेतेपद पटकावलं. दिव्याने अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हंपीला दुसऱ्या टायब्रेकरमध्ये पराभूत करत विश्वविजेतेपद जिंकले. विशेष म्हणजे एकीकडे मुलीचा विश्वचषकाचा सामना सुरु असतान तिचे वडील मात्र कर्तव्यावर असल्याचं दिसून आलं. त्यांनी मुलीच्या सामन्यापेक्षा रुग्णसेवेला प्राधान्य दिलं. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचं सर्वत्र कौतुक होतं आहे.