IPL 2020 : खेळाडू सोडा, पंजाबचा बॅटींग कोच बघा आधी कोण झालाय... 

Domestic stalwart Wasim Jaffer joins Kings XI Punjab as batting coach
Domestic stalwart Wasim Jaffer joins Kings XI Punjab as batting coach

नवी दिल्ली : सध्या कोलकत्यात आयपीएलच्या पुढील मोसमाचा लिलाव सुरु झाला आहे. त्यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब तगड्या खेळाडूंना आपल्या संघात सामिल करुन घेत आहे. मात्र, या सगळ्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने सकाळी आपला फलंदाजी प्रशिक्षक जाहीर केला आहे. 

भारतीय संघाचा माजी सलामीवीर  आणि विदर्भ क्रिकेट संघाचा आधारस्तंभ असणाऱ्या वसिम जाफरला पंजाबने फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून निवडले आहे. 

याच महिन्यात वसिम जाफर 150 रणजी सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पंजाबने नवीन जबाबदारी सोपविल्यावर त्याने सर्वप्रथम पंजाबचे प्रमुख प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला, "मी कुंबळेंचा आभारी आहे. तो स्वत:हून माझ्याकडे आला होता. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघात खेळणं ही अभिमानाची बाब होती. मी त्याच्याकडून खूप शिकलो आहे. मी सध्या बांगलादेशमध्ये प्रशिक्षक असलो तरीही ही खूप चांगली संधी आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com