esakal | "मला टॅग करु नका, मी मुख्यमंत्री नाही"; भारताच्या गोलकीपरची कळकळीची विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

Amerinder Singh

"मला टॅग करु नका, मी मुख्यमंत्री नाही"; भारताचा गोलकीपर वैतागला

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : पंजाबमध्ये सुरु असलेल्या राजकीय गोंधळात आता आणखी एक गोंधळ समोर आला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर त्यांच्या नावाचा ट्रेन्ड सुरु झाला. युजर्सनी ट्विट करताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांना टॅग करण्याऐवजी फूटबॉलपटू अमरिंदर सिंग याला टॅग करायला सुरुवात केली. युजर्सचा काहीतरी गोंधळ उडाल्याचं लक्षात आल्यानंतर "मला टॅग करु नका मी मुख्यमंत्री नाही" असं म्हणण्याची वेळच गोलकीपवर आली.

गोलकीपर अमरिंदर सिंग यानं ट्विट करुन म्हटलं की, प्रिय वृत्त माध्यमांनो, पत्रकारांनो मी अमरिंदर सिंग भारतीय फूटबॉल टीमचा गोलकीपर आहे. मी पंजाबचा माजी मुख्यमंत्री नाही. हात जोडून आनंदाश्रूंनी मी तुम्हाला विनंती करतो की मला टॅग करणं थांबवा"

गोलकीपर अमरिंदर सिंग यानं हे ट्विट केल्यानंतर त्याची दखल खुद्द कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घेतली आणि त्यांनी त्याचं ट्विट शेअर करत म्हटलं, "माझ्या तरुण मित्रा, मी तुझ्या त्रासाबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. तुझ्या पुढील खेळांसाठी शुभेच्छा"

या सर्व गोंधळाची पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर त्यांच्या ट्विटला पुन्हा गोलकीपर अमरिंदरनं प्रतिसाद दिला आणि त्यांचे आभार मानले. "कॅप्टन तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, तुम्हालाही शुभेच्छा" असं ट्विट त्यानं केलं.

loading image
go to top