
ऑनलाइन गेमिंग अॅपबाबत सरकारने कायदा लागू केला. यानंतर भारतात सर्व प्रकारच्या गेमिंग अॅपवर बंदी घालण्यात आलीय. याचा फटका ड्रीम ११ या अॅपलासुद्धा बसला आहे. ड्रीम ११ कंपनी आता भारतीय क्रिकेट संघाला स्पॉन्सर करू शकणार नाही अशी माहिती कंपनीकडून बीसीसीआयला देण्यात आलीय. आता आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघाला नवा स्पॉन्सर शोधावा लागेल.