दुसरी जर्सी नसल्याने त्याला सक्तीचा ब्रेक? 

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

स्वीडनविरुद्ध जर्मनीच्या आक्रमणाचा धडाका रुडला झालेल्या दुखापतीमुळे खंडित झाला. त्याला पुन्हा वेग देण्यासाठी जर्मनीचे खेळाडू संघाच्या डगआउटकडे सतत बघत होते. त्यांचा संताप वाढत होता. अखेर मार्गदर्शक जोशीम लोव यांनी रुडच्याऐवजी बदली खेळाडू उतरवला. 

सोची - स्वीडनविरुद्ध जर्मनीच्या आक्रमणाचा धडाका रुडला झालेल्या दुखापतीमुळे खंडित झाला. त्याला पुन्हा वेग देण्यासाठी जर्मनीचे खेळाडू संघाच्या डगआउटकडे सतत बघत होते. त्यांचा संताप वाढत होता. अखेर मार्गदर्शक जोशीम लोव यांनी रुडच्याऐवजी बदली खेळाडू उतरवला. 

रुडच्या नाकावर स्वीडनच्या आंद्रेस ग्रॅनक्विस्टचा बूट लागला. रुडच्या नाकातून रक्त येण्यास सुरवात झाली. त्यातील काही त्याच्या जर्सीवरही पडले. रक्त असलेला टी-शर्ट घालून मैदानात येण्यास प्रतिबंध असल्याने रुडला जर्सी बदलणे भाग पडले. 

रुडी मैदानाबाहेर उपचारानंतर मैदानात उतरण्यास तयार होता; पण त्याला घालण्यासाठी जर्सीच मिळत नव्हती; पण समालोचक सॅम मॅत्तेरफेस यांनी त्याच्याकडे अतिरिक्त जर्सी नसल्याची बाब नजरेस आणली. अखेर अतिरिक्त जर्सी नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने चिडून जर्सी मैदानात आपटली. त्याला बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. पूर्वार्धातील या घटनेनंतर रुडी जर्सी न घालताच मैदानात बसला. संघातील एकात्मता दाखवण्यासाठी मेसूत ओझीलनेही त्याची जर्सी काढली. दोघांचा शर्ट नसलेले छायाचित्र व्हायरलही झाले. 

Web Title: Due to no other jersey he forced break