esakal | CPL Final : अबतक 500! चॅम्पियन डिजे ब्रावोच्या नावे खास विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Dwayne Bravo

CPL Final : अबतक 500! चॅम्पियन डिजे ब्रावोच्या नावे खास विक्रम

sakal_logo
By
सुशांत जाधव

Saint Lucia Kings vs St Kitts and Nevis Patriots, Final: सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स (St Kitts and Nevis Patriots) यांच्यात कॅरेबियन लीगची फायनल रंगत सुरु आहे. सेंट किट्सचा कर्णधार ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) साठी खास असाच आहे. 37 वर्षीय ब्रावोनं टॉससाठी मैदानात उतरताच एक खास विक्रम त्याच्या नावे झाला. ब्रावोने टी-20 क्रिकेट (T20 Cricket) इतिहास 500 वा सामना खेळत आहे. कॅरेबियन क्रिकेटर केरॉन पोलार्डनंत एवढे टी-20 सामने खेळणारा तो दुसरा खेळाडू ठरलाय. वेस्ट इंडिजच्या केरॉन पोलार्डने (Kieron Pollard) टी-20 कारकिर्दीत सर्वाधिक 561 सामने खेळले आहेत.

ब्रावो सीपीएल स्पर्धेत सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स टीमचे नेतृत्व करत आहे. फायनल लढतीमध्ये ब्रावोनं खास विक्रम आपल्या नावे केला. ब्रावोने आपल्या टी-20 कारकिर्दीत 540 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 244 कॅच आणि 6566 धावंची त्याच्या नावे नोंद आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही कॅरेबियन खेळाडूच आहे.

हेही वाचा: IPL 2021 : मिस्टर 360 चा धमाका; प्रॅक्टिस मॅचमध्ये शतकी तडका

क्रिकेस गेलनं 446 टी-20 सामने खेळले आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक 436 तर भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 350 टी-20 सामने खेळले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे 311 टी-20 सामन्याची नोंद आहे. दिनेश कार्तिकनेही 300+ टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या खात्यात 317 सामन्यांची नोंद आहे.

हेही वाचा: ICC T20 Rankings: कोहली फायद्यात; केएल राहुल 'ना नफा ना तोटा'

आयपीएलमध्ये ब्रावो चेन्नई सुपर किंग्जच्या संघातून खेळतो. 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहे. CPL मधील धमाकेदार कामगिरी आणि खास रेकॉर्डसह ब्रावो चेन्नईच्या संघाला जॉईन होईल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीने दुसऱ्या टप्प्यातील आयपीएल स्पर्धेला शुभारंभ होणार आहे.

loading image
go to top