esakal | IPL 2021 : मिस्टर 360 चा धमाका; प्रॅक्टिस मॅचमध्ये शतकी तडका
sakal

बोलून बातमी शोधा

RCB

IPL 2021 : मिस्टर 360 चा धमाका; प्रॅक्टिस मॅचमध्ये शतकी तडका

sakal_logo
By
सुशांत जाधव

UAE च्या मैदानात रंगणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2021 UAE) दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा (RCB) संघ तगडी तयारी करत आहे. संघातील स्फोटक फलंदाज एबी डीव्हिलियर्सने (Ab de Villiers) टीमच्या इंट्रा स्‍क्‍वाड प्रॅक्टिस मॅचमध्ये धमाकेदार शतकी खेळी करुन स्पर्धेत धावांची बरसात करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

पहिल्या टप्प्यातील सामन्यानंतर बंगळुरुचा संघ गुणतालिकेत आघाडीच्या संघात आहे. डिव्हिलियर्स सरावसामन्याप्रमाणेच उर्वरित सामन्यात खेळला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पहिल्या जेतेपदाची प्रतिक्षा निश्चितच संपुष्टात येईल. भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यातही डिव्हिलियर्सने नावाला साजेसा खेळ केला होता. त्यानंतर पहिल्या इंट्रा स्क्वाड सराव सामन्यात त्याने आरसीबी B संघाविरुद्ध धमाका केला.

हेही वाचा: ICC T20 Rankings: कोहली फायद्यात; केएल राहुल 'ना नफा ना तोटा'

आरसीबी-A संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला होता. डिव्हिलियर्सने 46 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकाराच्या मदतीने 104 धावांची खेळी केली. मोहम्मद अझरुद्दीनने 43 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 66 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर आरसीबी A नं 212 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना केएस भरतच्या 95 धावा ओआणि पडिक्कलनं 21 चेंडूत केलेल्या 36 धावांच्या जोरावर 7 विकेट राखून सामना खिशात घातला.

हेही वाचा: रोनाल्डोचा गोल ठरला फोल; यंग बॉईजनं उडवला धुव्वा

सराव सामन्यातील शतकी खेळीनंतर डिव्हिलियर्स म्हणाला की, ज्यावेळी बसमधून उतरलो त्यावेळी भर दुपारी मैदानात उतरणे थोडं अवघडल्यासारखं वाटत होते. खेळपट्टी पाटा असून धावा करणे सहज सोपे असल्याचे खेळताना लक्षात आले. पार्टनरलाही तसेच सांगितले. सराव सामन्यातील फटकबाजी आनंद देणारी होती, असेही तो म्हणाला. आरसीबीचा संघ 20 सप्टेंबरला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या आबूधाबीच्या मैदानातील सामन्यातून दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात करेल.

loading image
go to top