World Cup : 'भूकंपामुळे जनतेवर दु:खाचा डोंगर पण.. इंग्लंडवरील विजय युवकांसाठी प्रेरणादायी'

World Cup : 'भूकंपामुळे जनतेवर दु:खाचा डोंगर पण.. इंग्लंडवरील विजय युवकांसाठी प्रेरणादायी'

Afghanistan World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने रविवारी इंग्लंडवर ६९ धावांनी ऐतिहासिक विजय साकारला. अफगाणिस्तानने इंग्लंडवर मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला हे विशेष. हाच धागा पकडून अफगाणिस्तानी संघाचे प्रशिक्षक जॉनाथन ट्रॉट म्हणाले, या देदीप्यमान विजयामुळे अफगाणिस्तानमधील असंख्य युवकांची पावले क्रिकेटकडे वळतील.

अफगाणिस्तानमध्ये गेल्या आठवड्याभरात तीन भूकंपाचे धक्के बसले. याचे परिणाम सर्वसामान्य जीवनावरही झाले. याच पार्श्वभूमीवर ट्रॉट म्हणाले, अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. सर्वसामान्य जनतेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अफगाणिस्तानच्या या विजयाने जनतेच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. असंख्य युवकांसाठी प्रेरणा ठरेल.

सर्वोत्तम क्रिकेट खेळावे लागेल ः बटलर

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडलाही मोठा धक्का बसला आहे. याप्रसंगी कर्णधार जॉस बटलर म्हणाला, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पहिल्या तीन लढतींबद्दल विशेष योजना आखली गेली. विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले, पण प्रत्यक्षात आम्हाला तीनपैकी एकाच लढतीत विजय मिळवता आला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला. आता हा पराभव मागे टाकावा लागणार आहे. उर्वरित सहा लढतींमध्ये सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे, असे तो पुढे म्हणाला.

इंग्लंडने २०१९ मधील विश्‍वकरंडक जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील विजय हा आमच्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे. फलंदाज व गोलंदाज अशा दोन्ही बाबींमध्ये आम्ही धडाकेबाज कामगिरी केली. अफगाणिस्तानसाठीही हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

— मुजीब उर रहमान, अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com