ED Action against Raina and Dhawan : मोठी बातमी! सुरेश रैना, शिखर धवनला ‘ED’चा दणका ; तब्बल ११.१४ कोटींची संपत्ती जप्त!

ED seized property of Suresh Raina and Shikhar Dhawan : जाणून घ्या, नेमकं कोणत्या प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने ही मोठी कारवाई केली?
ED officials seize properties worth ₹11.14 crore belonging to former Indian cricketers Suresh Raina and Shikhar Dhawan during a high-profile financial probe.

ED officials seize properties worth ₹11.14 crore belonging to former Indian cricketers Suresh Raina and Shikhar Dhawan during a high-profile financial probe.

esakal

Updated on

ED Takes Major Action Against Suresh Raina and Shikhar Dhawan : भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडून सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालय (ED)ने मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर सट्टेबाजी अ‍ॅप प्रकरणासंदर्भात ईडीने सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

ऑनलाइन सट्टेबाजी आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित 1xBet प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ही मोठी कारवाई केली आहे. ईडीने  सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या एकूण ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीचे म्हणणे आहे की दोन्ही क्रिकेटपटूंनी जाणूनबुजून "1xBet" आणि त्याच्याशी संबंधित सरोगेट ब्रँड - 1xBat, 1xBat स्पोर्टिंग लाइन्स यांचा प्रचार केला आणि त्यामुळे भारतात बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीला प्रोत्साहन मिळाले. तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार, या क्रिकेटपटूंनी परदेशी कंपन्यांसोबत प्रमोशनल करार केले आणि परदेशी चॅनेलद्वारे लेयर ट्रान्झिक्शनद्वारे पैसे दिले गेले. यामुळे बेकायदेशीर पैशांची खरी ओळख लपवली गेली.

ED officials seize properties worth ₹11.14 crore belonging to former Indian cricketers Suresh Raina and Shikhar Dhawan during a high-profile financial probe.
Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

एजन्सीच्या तपासात असे दिसून आले की 1xBet नेटवर्कने भारतात जवळपास एक हजार कोटींपेक्षा जास्त मनी लॉन्ड्रिंग केली आहे. भारतीय युजर्सकडून पैसे गोळा करण्यासाठी सहा हजारांहून अधिक "म्यूल अकाउंट्स" वापरण्यात आले. ईडीने आतापर्यंत चार कोटींपेक्षा अधिक रक्कम गोठवली आहे आणि चार पेमेंट गेटवेवर छापे टाकले आहेत.

ED officials seize properties worth ₹11.14 crore belonging to former Indian cricketers Suresh Raina and Shikhar Dhawan during a high-profile financial probe.
Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

रिपोर्टनुसार, 1xBet ने त्याच्या "क्रीडा प्रमोशन कॉन्ट्रॅक्ट्स" द्वारे भारतातील क्रिकेट आणि क्रीडा चाहत्यांपर्यंत आपली पोहच बनवली. या डीलअंतर्गत सेलिब्रिटी आणि इन्फ्लुर्सन प्रमोशनसाठी पैसे देऊन प्रचार केल गेला, ज्यामुळे बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्मला वैधतेचा स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com