

Amit Sehra, a Jaipur vegetable vendor Wins 11 crore Lottery
esakal
vegetable vendor Amit Sehra wins ₹11 crore lottery jackpotआजकाल कधी कुणासोबत काय घडेल काहीच सांगता येत नाही. तसंच कधी कुणाचं नशीब फळफळेल हे देखील सांगू शकत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. एका सर्वसाधारण भाजी विक्रेत्याला तब्बल ११ कोटींची लॉटरी लागली आहे, विशेष म्हणजे या भाजी विक्रेत्याकडे लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. मित्राकडून पैसे घेऊन त्याने स्वत:साठी एक आणि पत्नीसाठी एक अशी दोन तिकीटे खरेदी केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्थानातील एक सर्वसामान्य भाजी विक्रेत्याने पंजाब राज्य लॉटरी-दिवाळी बंपर २०२५मध्ये ११ कोटी रुपये जिंकले आहेत. अमित सेहरा असे नाव असणाऱ्या या भाजी विक्रेत्याने मित्राकडून पैसे उधार घेत, भटिंडा येथील एका दुकानातून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते.
विशेष म्हणजे, जेव्हा या भाजी विक्रेत्याला समजले की त्याला तब्बल ११ कोटींची लॉटरी लागली आहे, तेव्हा त्याला अक्षरशा रडू कोसळले. कारण, लॉटरी तिकीट बक्षीस घेण्यासाठीची औपचारिकता पूर्णकरण्यासाठी चंदीगडला जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते.
हा नशीबवान भाजी विक्रेता जयपूरच्या कोटपुतली येथील रहिवासी आहे. तब्बल ११ कोटींची लॉटरी लागल्यानंतर प्रतिक्रिया देताना हा भाजी विक्रेता म्हणाला, हा देवाचा आशीर्वाद आहे की, त्याने मला भरभरून दिले. शिवाय, त्याने हे देखील सांगितले की या पैशांचा वापर तो त्याच्या मुलांचे शिक्षण आणि एक चांगले घर बांधण्यासाठी करणार आहे.
याशिवाय या भाजी विक्रेत्याने त्याच्या पत्नासाठीही एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते आणि त्याच्या पत्नीला एक हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. पंजाब राज्य लॉटरीचा निकाल ३० ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.