ED summons Yuvraj Singh in online betting case
esakal
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने पुन्हा एकदा युवराज सिंगला समन्स पाठवलं आहे. २३ सप्टेंबर रोजी त्याची चौकशी होणार आहे. ऑनलाईन बेटिंग अॅपच्या प्रमोशन प्रकरणात ही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे हरभजन सिंग, सुरेश रैना, रॉबिन उतप्पा, यासारख्या मोठ्या क्रिकेटपटूंची नावं या प्रकरणात पुढे आली आहेत. अशातच आता युवराजला चौकशी साठी बोलवण्यात आल्याने विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.