टेबल टेनिसमध्ये पराभव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

वुक्‍सी (चीन) - भारताला आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानने 3-2 असे हरविले. त्यानंतर भारताने पाचव्या क्रमांकासाठी हॉंगकॉंगविरुद्ध झालेली लढतही 0-3 अशी गमावली. आता भारताला बुधवारी सातव्या क्रमांकासाठी खेळावे लागेल.

जपानविरुद्ध सौम्यजीत घोषने युया ओशिमा याला 7-11, 11-7, 11-6, 8-11, 11-6 असे हरवून आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर अचंता शरथ कमल याला कोकी निवा याच्याविरुद्ध तीन मॅचपॉइंट मिळाले होते; पण शरथ 11-1, 6-11, 8-11, 14-12, 12-10 असे हरला. मग हरमीत देसाईने केंटा मात्सुदैरा याच्याविरुद्ध चौथ्या गेममध्ये 10-10 बरोबरीनंतर कच खाल्ली. हरमीत 5-11, 8-11, 11-2, 14-12, 11-6 असे हरला. मग शरथने युयाला 11-8, 11-13, 11-5, 6-11, 11-6 असे हरवून बरोबरी साधून दिली. निर्णायक लढतीत घोष आणि कोकी यांच्यात मुकाबला होता. त्यात घोष 9-11, 11-9, 11-7, 11-4 असा हरला.

Web Title: efeat in table tennis