ऍग्युएरोवर चार सामन्यांची बंदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

लंडन : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू सर्गी अग्युएरो याच्यावर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत चेल्सीविरुद्ध खेळताना मॅंचेस्टर सिटीकडून खेळणाऱ्या ऍग्युएरो याला पंचांनी रेड कार्ड दाखवले होते. त्यापूर्वी ऍग्युएरो आणि चेल्सीचा डेव्हिड लुईझ यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या मोसमातच याआधी ऍग्युएरो तीन सामन्यांना मुकला आहे. चेल्सीने हा सामना 3-1 असा जिंकला. खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने चेल्सी आणि मॅंचेस्टर सिटी या दोन्ही संघांवर कारवाईची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.
 
Web Title: Egyuero four-match ban

टॅग्स