French Open 2023: आजारपणामुळे रायबाकिनाची तिसऱ्या फेरीतून माघार

आजारपणामुळे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीतून माघार घेतली
Elena Rybakina withdraws from French Open 2023
Elena Rybakina withdraws from French Open 2023

Elena Rybakina French Open 2023 : चौथ्या मानांकित एलिनी रायबाकिना हिने आजारपणामुळे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीतून माघार घेतली. तिचा सामना आज सारा सोरोबेस टोर्मो हिच्याशी होणार होता. रायबाकिनाच्या या माघारीमुळे महिलांमध्ये संभाव्य विजेती असू शकणारी खेळाडू कोर्टवर न उतरताच स्पर्धेबाहेर गेली.

विम्बल्डन विजेत्या रायबाकिनाकडे या फ्रेंच स्पर्धेत संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात होते. गेल्या दोन दिवसांपासून तिची प्रकृती बरी नव्हती. टोर्मोविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी वॉर्मअप करत असतानाच तिने न खेळण्याचा निर्णय घेतला.(Elena Rybakina withdraws from French Open 2023)

Elena Rybakina withdraws from French Open 2023
Thailand Open Lakshya Sen: विजेतेपदाचे ‘लक्ष्य’ हुकले! थायलंड ओपन बॅटमिंटन स्पर्धेत सेन उपांत्य फेरीत पराभूत

कालही मला बरे वाटत नव्हते. त्याच्या दोन दिवस अगोदर माझी झोप झाली नव्हती. हलका तापही होता, असे सांगणाऱ्या रायबाकिनाला संसर्गाचा त्रास अगोदरपासून आहे. आज वॉर्मअम करताना मला थकवा जाणवू लागला. अशा परिस्थितीत खेळणे आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे माघार घेणेच योग्य आहे, असे रायबाकिनाने सांगितले.

मी डॉक्टरांचा सल्लाही घेतला होता. पॅरिसमध्ये असलेल्या विषाणूचा मला त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु मला मुळात संसर्गाचा त्रास असल्यामुळे माझी प्रतिकार शक्ती कमी झाली आहे, असे रायबाकिना म्हणाली.

Elena Rybakina withdraws from French Open 2023
Women's Junior Asia Cup Hockey : अन्नूची डबल हॅट्ट्रिक; भारताने उझबेकिस्तानविरूद्ध केले तब्बल 22 गोल

रोम ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळवून रायबाकिनाने या फ्रेंच ओपनसाठी चांगला सराव केला होता. एवढ्या मोठ्या स्पर्धेत अशा प्रकारे माघार घ्यावी लागल्यामुळे मी फार निराश झाले आहे; परंतु आयुष्यात असे प्रसंग येत असतात. चढ-उताराचा सामना करावा लागतोच. मला १०० टक्के प्रयत्न करायचे होते, पण मी त्यासाठी १०० टक्के तंदुरुस्त नव्हते, असे सांगून रायबाकिना म्हणाली, सकारात्मक दृष्टिकोनातून मी येथे आले होते. पण पुढे काय आहे याची कल्पना नव्हती, मी स्वतःला दुर्दैवी समजते. आता पूर्ण बरी होऊन ग्रास कोर्ट मोसमासाठी मला सज्ज व्हायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com