INDW vs AUSW : 6,6,6,6... पेरीने फोडले; भारतासमोर कांगारूंचे 189 धावांचे मोठे आव्हान

India Women vs Australia Women 4th T20I
India Women vs Australia Women 4th T20IESAKAL

India Women vs Australia Women 4th T20I : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 3 बाद 188 धावा ठोकत भारतासमोर मोठे आव्हान ठेवले. मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला हे आव्हान पार करावेच लागेल. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्लेघ गार्डनेरने 27 चेंडूत 42 धावांची खेळी केली. तर अनुभवी एलिस पेरीने 72 धावांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तिने आपल्या खेळीत 4 षटकार 7 चौकार ठोकले.

India Women vs Australia Women 4th T20I
Lionel Messi : आजीने कोचकडे तगादा लावला अन् जगाला 'जादुगार मेस्सी' मिळाला

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी कांगारूची अवस्था 2 बाद 46 अशी केली होती. मात्र त्यानंतर अश्लेघ गार्डनेर आणि एलिस पेरीने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचली. अखेर दिप्ती शर्माने 27 चेंडूत 42 धावा करणाऱ्या गार्डनेरला बाद करत ही जोडी फोडली.

India Women vs Australia Women 4th T20I
Sachin Tendulkar : 'ती' जाहिरात केली असती तर घरी जाऊ शकलो नसतो; सचिनने सांगितला शारजातील इनिंगनंतरचा किस्सा

यानंतर पेरीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. तिने अर्धशतकी खेळी करत स्लॉग ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. तिने ग्रेस हॅरिससोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद 48 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी शेवटच्या 20 चेंडूत रचण्यात आली. पेरीने 42 चेंडूत नाबाद 72 धावा ठोकल्या. त्यात 4 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. तर हॅरिसने 12 चेंडूत नाबाद 27 धावांचे योगदान दिले. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com