Elyssa Healy : तो माझा कॅमेरा... एलिसा हेलीने सांगितले भारतीय संघाचा फोटो का काढला

Elyssa Healy
Elyssa Healy esakal

Elyssa Healy : भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा एकमेव कसोटी सामना 8 विकेट्स राखून जिंकला. भारतीय महिला संघाचा हा कसोटी क्रिकेटमधील ऑस्ट्रेलिया संघावर मिळवलेला पहिला विजय आहे. या सामन्यादरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेली यांच्यात ऑन फिल्ड टशन देखील पहायला मिळाली होती.

मात्र भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर कांगारूंची कर्णधार एलिसा हेलीने भारतीय संघाचा फोटो काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हेलीच्या या कृतीचे सर्वांनीच कौतुक केले. आता हेलीने भारतीय संघाचा फोटो का काढला हे सांगितले.

Elyssa Healy
Look Back 2023 : सरत्या वर्षात सर्वात जास्त कष्ट ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उपसले

एलिसा हेलीने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'तो माझा कॅमेरा नव्हता. सुरक्षा रक्षक कॅमेरामनला मागे ढकलत होते. त्यामुळे मी त्यांना मदत करण्याचा विचार केला अन् त्यांना एक जवळून चांगला फोटो काढून दिला. मात्र मी फोटो काढताना अनावधानाने अर्ध्या भारतीय संघाला फ्रेमच्या बाहेरच ठेवलं. त्यामुळे त्यांना मी काढलेल्या फोटोचा काही फायदा होईल असं वाटत नाही.'

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतासमोर चौथ्या दिवशी विजयासाठी 75 धावांचे माफक आव्हान होते. हे आव्हान भारताने 8 विकेट्स राखून पार केलं. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियापूर्वी इंग्लंड संघाला देखील कसोटीत पराभूत केलं होतं. भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 406 धावा ठोकल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 आणि दुसऱ्या डावात 261 धावा केल्या होत्या.

Elyssa Healy
Sharad Pawar : निर्णय घेण्यास उशीर केला... WFI च्या निलंबनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

भारतीय महिला क्रिकेट संघाने 1995 नंतर पहिल्यांदाच मायदेशात एकापेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय महिला संघाने दोन्ही सामन्यात सकारात्मक क्रिकेट खेळलं. भारतीय संघ फार कमी वेळा अडचणीत आला होता. संघाने जवळपास प्रत्येक सेशनवर आपलं नियंत्रण ठेवलं होतं.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com