
रविवारचा दिवस क्रीडा रसिकांसाठी रोमांचक राहिला. एकिकडे कार्लोस अल्काराजने साडेपाच तासांच्या लढतीनंतर फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले. यानंतरच काही वेळातच ४० वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने युएफा नेशन्स लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद नावावर केले.
अत्यंत रोमांचक झालेल्या नेशन्स लीगच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने स्पेनला पेनल्टी शूट आऊटमध्ये ५-३ अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. ही रोनाल्डोच्या कारकिर्दीतील तिसरी आंतरराष्ट्रीय ट्रॉफी आहे.