चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया २ बाद २३;भारताकडे 129 धावांची आघाडी

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 23 आहे. भारताकडे आणखी 129 धावांची आघाडी आहे.

रांची-भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 23 आहे. भारताकडे आणखी 129 धावांची आघाडी आहे.

रांची कसोटी सामन्याचा चौथा दिवस चेतेश्वर पुजाराचा राहिला. पुजाराने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले. साहा व पुजारा यांनी संयमी फलंदाजी करीत भारताच्या डावाला आकार दिला. चेतेश्वर पुजाराने 525 चेंडूंचा सामना करत 202 धावा केल्या तर साहा 117 धावा काढून माघारी परतला. यानंतर रविंद्र जडेजानेही वेगवान अर्धशतक लगावले. भारताने पहिला डाव 603 धावांवर घोषित केला. पहिल्या डावाअखेर भारताने 152 धावांची आघाडी घेतली होती. चेतेश्वर पुजाराचे द्विशतक व वृद्धिमान साहाचे शतक यांच्या बळावर भारताने 600 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारतीय डाव घोषित केला. 

त्यानंतर दुसऱ्या डावात खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली.रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दोन फलंदाजांना बाद करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली.

Web Title: At the end of day 4 Australia 23/2