KL राहुल नडला; मॅच रेफ्रीनं फाडली मोठ्या रक्कमेची पावती!

मॅच रेफ्रींनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
KL Rahul
KL RahulPTI

India vs England 4th Test : इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पिछाडीवरुन दमदार कमबॅक केले आहे. टीम इंडियाने एका बाजूला इंग्लंडसमोर डोंगराऐवढे लक्ष्य ठेवले असताना दुसऱ्या बाजूला केएल राहुल (KL Rahul) मोठा फटका बसलाय. सामन्यातील तिसऱ्या दिवशीच्या एका घटनेमुळे मॅच रेफ्रींनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

मैदानातील पंचांनी दिलेल्या निर्णयावर केएल राहुलने नाराजी व्यक्त केली होती. शनिवारी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 34 व्या षटकात ही घटना घडली. DRS नंतर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याला बाद देण्यात आले. अंपायरच्या निर्णयानंतर लोकेश राहुलने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्याला लाखाहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमालीच्या अचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या डावात लोकेश राहुलने 101 चेंडूंचा सामना करताना 46 धावा केल्या होत्या.

KL Rahul
भारतीय फलंदाजांनी केली इंग्लंडची धुलाई; दिलं डोंगराएवढं आव्हान

आयसीसीच्या निवेदनानुसार, लोकेश राहुलला क्रिकेट अचारसंहितेच्या कलम 2.8 नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. हे कलम अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शवण्यासंदर्भातील आहे. या वर्तणुकीमुळे दंडात्मक कारवाईशिवाय एक डिमेरिट पॉइंटही त्याच्या खात्यात जमा झाला आहे. लोकेश राहुलने आपली चुक मान्य केली आहे. त्यामुळे याची अधिकृत सुनावणी करण्याची आवश्यकता भासली नाही, असे आयसीसी एलिट पॅनलमधील रेप्ऱी क्रि ब्राड यांनी स्पष्ट केले आहे.

KL Rahul
VIDEO : विराट भाऊनं ड्रेसिंग रुमच्या दरवाज्यावर काढला राग!

मैदानातील अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ आणि एलेक्स वार्फ यांच्यासह तिसरे पंच मायकल गॉ आणि फोर्थ अंपायर मायक बर्न्स यांनी राहुलवरी आरोपावर शिक्कामोर्तब केला होता. या प्रकरणात सामना फीच्या 50 टक्के रक्कम आणि 1 ते 2 डेमेरिट पॉइंटचा भुर्दंड खेळाडूला सहन करावा लागतो. परंतु राहुलला केवळ 15 टक्के रक्कम दंड स्वरुपात द्यावी लागेल. ही रक्कम जवळपास 1 लाख 80 हजारच्या घरात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com