esakal | VIDEO : विराट भाऊनं ड्रेसिंग रुमच्या दरवाज्यावर काढला राग!
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

VIDEO : विराट भाऊनं ड्रेसिंग रुमच्या दरवाज्यावर काढला राग!

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातही कोहलीच्या शतकी खेळीचा दुष्काळ कायम राहिला. चौथ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात विराट कोहलीनं ((Virat Kohli) ) चांगली सुरुवात केली. पण बिल्ड केलेली इनिंग मोठ्या बिल्डिंगमध्ये रुपांतरित करण्यात (धावांची इमारत रचायला) तो पुन्हा अपयशी ठरला. मोईन अलीच्या फिरकीच्या जाळ्यात तो फसला. त्याचे अर्धशतक अवघ्या सहा धावांनी हुकले. मोईन अलीने सहाव्यांदा त्याला तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यात विराट कोहली बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावून विकेट फेकताना पाहायला मिळाले.

इंग्लंड दौऱ्यावर जलदगती गोलंदाजांना विकेट फेकणाऱ्या कोहली ओव्हलच्या मैदानात मोईन अलीचा (Moeen Ali) शिकार ठरला. क्रेग ओव्हरटनच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. बाद झाल्यानंतर कोहलीने स्वत:वरच राग व्यक्त केला. ड्रेसिंग रुमध्ये जाताना त्याने दरवाज्यावर हात आपटल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

हेही वाचा: जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा; अंजिक्य होतोय ट्रोल

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील 4 कसोटी सामन्यातील 8 डावात 31.14 च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मोठ्या दौऱ्यात कोहलीच्या भात्यातून शतकी खेळी पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत. पण लयीत दिसत असताना त्याचे मोठी खेळी करण्याचे गाणे बिघडताना पाहायचला मिळाले.

चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. आश्वासकपणे खेळत असताना ओली रॉबिन्सनने त्याला तंबूत धाडले. आणि शतकाची प्रतिक्षा लांबणीवर गेली. जेम्स अँडरसनच्या तुलनेत या दौऱ्यावर मोजके सामने खेळलेला रॉबिन्सन कोहलीला चांगलाच दमदवाताही दिसले. त्याने तीन वेळा कोहलीची विकेट घेतली आहे. 2019 मध्ये बांगलवादेशविरुद्ध कोहलीच्या भात्यातून शेवटचे शतक आले होते.

हेही वाचा: Paralympics Closing Ceremony : अवनीनं थाटात फडकवला तिरंगा!

कोलकाता कसोटीत त्याने 70 वे आंतराष्ट्रीय शतक झळकावले. त्यानंतर त्याच्या शतकाला जणू ग्रहणच लागले आहे. दुसऱ्या डावात पुन्हा त्याने शतकांचा 'विराट' दुष्काळ संपवण्याचे संकेत दिले. पण ते आता पुन्हा लाबणीवर पडले आहे. पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत तरी तो शतकाला गवसणी घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top