esakal | ENG vs IND : मास्कवरुन नेटकऱ्यांनी घेतली पंतची शाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant

ENG vs IND : मास्कवरुन नेटकऱ्यांनी घेतली पंतची शाळा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) कोरोना विषाणूवर मात करत फिट झालाय. बीसीसीआयने (BCCI) त्याचा एक फोटो शेअर करत आनंदाची बातमी क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलाय. या फोटोनंतर नेटकऱ्यांनी पंतला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. या फोटोमध्ये पंत मास्क घालून दिसतोय. 'थम्स अप' करत सर्व काही ठिक असल्याचा इशाराही तो करताना दिसते. मात्र त्याने घातलेल्या मास्कवरुन नेटकऱ्यांनी त्याची शाळा घेतलीये. (ENG vs IND BCCI Shared Rishabh Pant Mask waring Photo netizens Trolled On Social Media )

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मोठ्या दौऱ्यापूर्वी भारतीय संघ सुट्टीचा आनंद घेताना पाहायला मिळाले. खेळाडूंनी इंग्लंडमधील वेगवेगळ्या भागात सैर केल्याचे काही फोटोही समोर आले होते. रिषभ पंतने या काळात युरो फुटबॉल स्पर्धेचा स्टेडियमवर जाऊन आनंद घेतला होता. मात्र विश्रांतीचा कालावधी संपत असताना त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तो आपल्या एका नातेवाईकाच्या घरी क्वारंटाईन झाला होता.

हेही वाचा: Olympics : उद्घाटनाला मोजके भारतीय खेळाडू राहणार उपस्थितीत

आता तो यातून सावरला असून कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर संघातील इतर सहकाऱ्यांसोबत बायोबबलमध्ये प्रवेश करण्याचा त्याचा मार्ग मोकळा झालाय. लवकरच तो डरहममध्ये संघाला जॉईन करेल.

बीसीसीआयने पंतचा फोटो शेअर करताना त्याला खास कॅप्शनही दिले आहे. तुझ्या कमबॅकचा आनंद आहे, या आशयाच्या कॅप्शनसह बीसीसीआयने त्याचा फोटो शेअर केलाय. त्याच्या मास्कवरील डिझाईनमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. याअगोदर मास्क वापरला असतास तर टीम इंडियातून बाहेर राहण्याची वेळच आली नसती, असा टोला काहींनी लगावला आहे.

हेही वाचा: ENG vs IND : इंग्लंडला मदत करणं टीम इंडियाच्या आलं अंगलट

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पंतला काउंटी सिलेक्ट इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्यात भाग घेता आला नाही. आता तो फिट असून दुसऱ्या सराव सामन्यासह इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील पराभवानंत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील इंग्लंड विरुद्धच्या मालिकेने भारतीय संघ दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील दावेदारी भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

loading image