ENG vs IND: चित्त्यासारखा चपळ बुमराह... हवेत सुरेख डाईव्ह मारत घेतला झेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah jumps like leopard takes ben stokes catch video

ENG vs IND: चित्त्यासारखा चपळ बुमराह... हवेत सुरेख डाईव्ह मारत घेतला झेल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीतील तिसरा दिवसाचा खेळ सुरू आहे. पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने या सामन्यात आपले पूर्णपणे वर्चस्व राहिले होते. पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लिश फलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आहे. बेअरस्टोच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाज गारद झाले.(Jasprit Bumrah jumps like leopard takes ben stokes catch video)

हेही वाचा: कडकनाथ कोंबड ते 40 रुपयांमध्ये डॉक्टर, पाहा धोनीचा देशी अंदाज

इंग्लंडने पहिल्या सत्रात 18.3 षटकात 116 धावा केल्या. यादरम्यान त्याने कर्णधार बेन स्टोक्सची एकमेव विकेट गमावली आहे, ज्याला शार्दुल ठाकूरने बाद केले. बेअरस्टो 91 आणि बिलिंग्ज 7 धावांवर खेळत आहेत. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला बेअरस्टोचा विराट कोहलीसोबत वाद झाला. त्यानंतर इंग्लिश फलंदाजाने आक्रमक फॉर्म घेतला. उपाहारापर्यंत इंग्लंडने 6 गडी गमावून 200 धावा केल्या आहेत.

स्टोक्स 18 धावांवर खेळत असताना 36व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शमीने पहिला झेल सोडला. यानंतर काही वेळातच 38व्या षटकात मिडऑफमध्ये कर्णधार बुमराहचा झेल सुटला. पण सुटलेल्या झेलच्या पुढच्याच चेंडूवर स्टोक्सने परत हवेत शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारतीय कर्णधाराने बॉलकडे चित्त्यासारखी डावीकडे झेप घेत एक सुरेख झेल घेतला.

Web Title: Eng Vs Ind Test Jasprit Bumrah Jumps Like Leopard Takes Ben Stokes Catch Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jasprit BumrahENG vs IND
go to top