
अँडरसन आणि केन विल्यमसन 17 वेळा समोरासमोर आले आहेत. यात 7 व्यांदा अँडरसनने त्याची विकेट घेतली आहे.
VIDEO : कमनशीबी विल्यमसन, चेंडू खेळूनही झाला आउट!
England vs New Zealand, 1st Test: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवार पासून सुरुवात झाली. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन(James Anderson) याने पहिल्या दिवशी कमालीची गोलंदाजी केली. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) स्वस्तात माघारी धाडले. विल्यमसनने संघाच्या धावसंख्येत अवघ्या 13 धावांची भर घातली. 33 चेंडूचा सामना करताना केन विल्यमसनने 2 चौकार खेचले. अँडरसनने टाकलेला चेंडू केन विल्यमसनने डिफेन्स तर केला. पण तो जमीनवर पडून यष्टीवर जाऊन आदळला आणि केनचा खेळ खल्लास झाला. या विकेटसह अँडरसनने कसोटी कारकिर्दीतील 615 वी विकेट घेतली.
हेही वाचा: ENG vs NZ: क्रिकेटच्या पंढरीत अँडरसनच्या नावे मोठा विक्रम
हेही वाचा: न्यूझीलंड विरुद्ध खेळताना जो रुटचे टिम इंडियाला चॅलेंज
अँडरसनच्या इनस्विंग चेंडू केन डिफेन्स करायला गेला. पण बॅटला लागून चेंडू यष्टिवर आदळला. इनस्विंग झालेला चेंडू केनने उत्तमरित्या खेळला पण तो विकेट वाचवू शकला नाही. तो अनलकी असावा, अशा पद्धतीने त्याची विकेट पडली. अँडरसन आणि केन विल्यमसन 17 वेळा समोरासमोर आले आहेत. यात 7 व्यांदा अँडरसनने त्याची विकेट घेतली आहे. ज्यावेळी केन बाद झाला त्यावेळी न्यूझीलंडच्या धावफलकावर 86 धावा होत्या. न्यूझझीलंड कर्णधाराच्या रुपात न्यूझीलंडने दुसरी विकेट गमावली. यापूर्वी टॉम लॅथम (Tom Latham) च्या रुपात न्यूझीलंडने पहिली विकेट गमावली होती. इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याने त्याला 23 धावांवर बोल्ड केले.
Web Title: Eng Vs Nz James Anderson Dismisses Kane Williamson For 7th Time In Test Cricket Watch
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..