ENG vs PAK: पाकिस्तानचा हिरो ठरला झिरो; व्हिडिओ होतोय व्हायरल

वनडे सामन्याने इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेला सुरुवात झालीये.
ENG vs PAK
ENG vs PAKTwitter

Eng vs PAK 1St ODI : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात झालीये. इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या बेन स्टोक्सने (Ben Stokes) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पहिल्याच षटकात पाकिस्तानने दोन विकेट गमावल्या. जलदगती गोलंदाज साकिब महमूदने (Saqib Mahmood) ने पहिल्याच चेंडूवर इमाम उल हक (Imam-ul-Haq) याला तंबूत धाडले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही ((Babar Azam) ) तिसऱ्या चेंडूवर जाळ्यात अडकला. त्यालाही खाते उघडता आले नाही. (Eng vs PAK 1St ODI Saqib Mahmood First Over Golden Duck For Imam And Babar Azam Watch Video)

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेपूर्वीच इंग्लंडच्या संघातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना कोरानाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. इंग्लंडकडून पाच जणांनी या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली.

ENG vs PAK
VIDEO : स्लो इनिंगचा 'बापमाणूस', 3 धावांसाठी खेळले 100 चेंडू

पाकिस्तानचा कर्णधार गेल्या काही सामन्यांपासून दमदार फॉर्ममध्ये आहे. सातत्याने धावा करत असलेल्या बाबर आझमल साकिबने चतुराईने बाद केले. ऑफ स्टम्पवर टाकलेला चेंडू आउट स्विंग करत त्याने बाबरला चालते. केले. स्लिपमध्ये क्राउलेने त्याचा झेल टिपला.

ENG vs PAK
Euro 2020 : डॅनिश गोलीच्या डोळ्यांवर लेझरचा मारा (VIDEO)

सलामीवर फखर झमानच्या 47, शदाब खान 30, शोएब मकसूद 19, शाहीन आफ्रिदी 12 आणि मोहम्मद रिझवानच्या 13 धावा वगळता अन्य एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी पाकिस्तानचा डाव 35 .2 षटकात 141 धावांत आटोपला. इंग्लंडकडून साकिब महमूदने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. मॅथ्यू परकिसन, क्रिग ओव्हर टन यांनी प्रत्येकी 2-2 तर लुईसला एक विकेट मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com