esakal | VIDEO : स्लो इनिंगचा 'बापमाणूस', 3 धावांसाठी खेळले 100 चेंडू
sakal

बोलून बातमी शोधा

Hashim Amla

VIDEO : स्लो इनिंगचा 'बापमाणूस', 3 धावांसाठी खेळले 100 चेंडू

sakal_logo
By
सुशांत जाधव

दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला (Hashim Amla) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसत नसला तरी काउंटी क्रिकेटमध्ये त्याचा प्रवास सुरुच आहे. मैदानात नांगर टाकून बराच वेळ काढणाऱ्या फलंदाजांपैकी तो एक आहे. आपल्या संयमाची आणखी एक झलक त्याने नुकतीच दाखवून दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेतली असली तरी आपल्यातील क्रिकेट अजूनही जिंवत आहे, याचा नजराणाच त्याने दाखवून दिला. (county-championship-2021-twitter-goes-berserk-after-hashim-amla-scores-37-off-278-watch Video)

संघाला अडचणीतून बाहेर काढताना त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. त्याने क्रिकेट जगतातील सर्वात स्लो इनिंग खेळून संघाला पराभवाच्या खाईत पडण्यापासून वाचवले. काउंटी चॅम्पियनशिप (County Championship) स्पर्धेत सरे आणि हॅम्पशायर यांच्यात रंगलेल्या सामन्यात हाशिम अमलाने 278 चेंडूचा सामना करताना नाबद 37 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे सामना ड्रॉ राहिला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी सरे टीम पराभवाच्या छायेत होती. यावेळी हाशिम आमला मैदानात थांबला आणि त्याने मॅच ड्रॉ करुन दाखवली. त्याच्या या खेळीच्या जोरावर सरेने अखेरच्या दिवशी 8 बाद 128 धावा केल्या. अमलाने पहिल्या 100 चेंडूच्या खेळात केवळ 3 धावा केल्या होत्या.

हेही वाचा: ऑलिम्पिकपूर्वी जपानमध्ये 'व्हायरस इमर्जन्सी'

या खेळीसह एक खास रेकॉर्ड त्याच्या नावे नोंदवला गेलाय. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 40 पेक्षा कमी धावांसाठी सर्वाधिक चेंडू खेळणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. त्याच्या या खेळीच सोशल मीडियावर कौतुक होत आहे. क्रिकेटच्या मैदानात असा चिवटपणा दाखवणं खूप मोठं आव्हान असंत. त्यामुळेच त्याच्या या स्लो खेळीला दाद मिळत आहे.

हेही वाचा: Euro 2020 : डॅनिश गोलीच्या डोळ्यांवर लेझरचा मारा (VIDEO)

अमलाने यापूर्वी भारतीय संघाविरुद्ध अशीच चिवट खेळ केली होती. 2015 मध्ये त्याने 244 चेंडूत केवळ 25 धावा केल्या होत्या. डिव्हिलियर्सच्या साथीनं त्याने दक्षिण आफ्रिकेचा पराभव टाळला होता. या ऐतिहासिक सामन्यात डिव्हिलियर्सने 297 चेंडूत 43 धावांची खेळी केली होती.

loading image