England vs West Indies : वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा! वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या ९ खेळाडूंचा पत्ता कट

England announce squad for West Indies ODIs and T20Is
England announce squad for West Indies ODIs and T20Is

England announce squad for West Indies ODIs and T20Is : 2019 मध्ये मायदेशात एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकणारा इंग्लंड संघ यावेळी भारतात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपमध्ये एकदम खराब कामगिरी केली. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील हा संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. पण नऊ पैकी तीन सामने जिंकून 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे.

वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर इंग्लंड संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता इंग्लंडला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-20 संघांची घोषणा केली असून त्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या संघातील नऊ खेळाडूंना वनडे संघातून वगळण्यात आले आहे.

England announce squad for West Indies ODIs and T20Is
World Cup 2023 : आता कामगिरीत सातत्य राखण्याचा ध्यास; भारताचा आज नेदरलँड्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना

वर्ल्ड कप खेळणाऱ्या इंग्लंड संघातील केवळ सहा खेळाडूंना वनडे मालिकेसाठी संधी दिली आहे. या खेळाडूंमध्ये कॅप्टन बटलर, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिव्हिंग्स्टन, गस एटिंग्सन, ब्रेडन कार्स यांना संघात कायम ठेवण्यात आले आहे.

उर्वरित खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ईसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वनडे संघात सहा खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे, परंतु ज्या खेळाडूंची निवड झाली नाही त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नाही.

इंग्लंडचा वेस्ट इंडिज दौरा 3 डिसेंबरपासून सुरू होत आहे. दुसरा सामना 6 डिसेंबरला तर तिसरा सामना 9 डिसेंबरला होणार आहे. 12 डिसेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा सामना अनुक्रमे 14, 16, 19 आणि 21 डिसेंबर रोजी होणार आहे.

  • इंग्लंड एकदिवसीय संघ : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, गुस एटिंग्सन, हॅरी ब्रूक, ब्रायडन कर्स, जॅक क्रॉली, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, लियाम लिव्हिंग्स्टन, ऑली पोप, फिल सॉल्ट, जोश टंग, जॉन टर्नर

  • इंग्लंडचा टी-20 संघ : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, गुस एटिंग्सन, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, विल जॅक, लियाम लिव्हिंग्स्टन, टायमल मिल्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग, रीस टोपले, जॉन टर्नर, ख्रिस वोक्स.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com