World Cup 2019 : इंग्लंडसमोर बांगलादेशची शरणागती; सलग दोन वर्ल्ड कप पराभवांची परतफेड

World Cup 2019 : इंग्लंडसमोर बांगलादेशची शरणागती; सलग दोन वर्ल्ड कप पराभवांची परतफेड

वर्ल्ड कप 2019 : कर्डिफ : इंग्लंडने बांगलादेशकडून झालेल्या गेल्या दोन विश्‍वकरंडक स्पर्धेतील पराभवाने उट्टे सव्याज काढले. अगोदर बांगलादेशची गोलंदाजी चोपून काढली नंतर त्यांच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. इंग्लंडने हा सामना 106 धावांनी जिंकला 

2011 च्या स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत बांगलादेशने इंग्लंडचा पराभव करून त्यांना स्पर्धेबाहेर काढले होते. ती सल कायम असणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांनी आज बांगलादेशच्या गोलंदाजांना प्रतिकार करण्याचीही संधी दिली नाही. मुळात फलंदाजीस उपयुक्त खेळपट्टी आणि लख्ख सूर्यप्रकाश असे वातावरण असतानाही बांगलादेशने इंग्लंडला प्रथम फलांजीसाठी निमंत्रित करून पायावर थोंडा मारून घेतला. प्रथम फलंदाजीत इंग्लंडने 6 बाद 386 धावा केल्या त्यानंतर बांगलादेशकडून शकिब अल हसनने 121 धावांची खेळी करूनही त्यांना 280 धावांत गुंडाळले. शकिबनंतर मोहमदुल्ला आणि मोसादेक हुसेन यांना थोडाबहुत प्रतिकार केला. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत सातव्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणाऱ्या इंग्लंडला जेसन रॉय आणि बेअरस्टॉ यांनी 128 धावांची सलामी दिली तेथेच मोठ्या धावसंखेचे संकेत मिळाले. बांगलादेश कर्णधार मुशरफी मोर्तझाने शकिब अल हसन या फिरकी गोलंदाजाद्वारे आक्रमण सुरु केले, पण या चालीला तेवढेच चोख प्रत्युतर रॉय-बेअरस्टॉ यांनी दिले. शकिबने 10 षटकांत 71 धावा दिल्या यावरून खेळपट्टी फिरकीसही साथ देणारी नव्हती हे स्पष्ट झाले. 

इंग्लंडचे प्रमुख फलंदाज धावांच्या प्रवाहात हात धुवून घेत असताना ज्यो रूट मात्र अपयशी ठरला. मात्र बटलर आणि कर्णधार मॉर्गन यांनी डावाच्या मध्यावर चांगलीच टोलेबाजी केली. मेहदी हसनला सलग तीन षटकार मारून रॉय दीड शतक करून बाद झाला. बेन स्टोक्‍सही या संधीचा फायदा घेऊ शकला नाही, परंतु ख्रिस व्रुक्‍स आणि प्लंकेट या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत बांगलादेशी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. 

संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड ः 50 षटकांत 6 बाद 386 (जेसन रॉय 153 -121 चेंडू, 14 चौकार, 5 षटकार, जॉनी बेअरस्टॉ 51 -50 चेंडू, 6 चौकार, जॉस बटलर 64 -44 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार, इयॉन मॉर्गन 35 -33 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, ख्रिस व्रुक्‍स नाबाद 18 -8 चेंडू, 2 षटकार, लिएम प्लंकेट नाबाद 27 -9 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, महम्मद सैफउद्दीन 9-0-78-2, मेहदी हसन 10-0-67-2) वि. वि. ः बांगलादेश ः 48.5 षटकांत सर्वबाद 280 (शकिब अल हसन 121 -119 चेंडू, 12 चौकार, 1 षटकार, मोहमदुल्ला 28, जोफ्रा आर्चर 8.5-2-30-3, बेन स्टोक्‍स 6-1-23-3)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com