Jos Buttler : पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार बटलर मुकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jos Buttler

Jos Buttler : पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार बटलर मुकणार

Jos Buttler England vs Pakistan : तब्बल १७ वर्षांनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानमध्ये सात टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यास दाखल झाला खरा, पण लगेचच त्यांना मोठा धक्का बसला आहे. कर्णधार जॉस बटलर पोटरीच्या दुखापतीमुळे पूर्ण मालिकेस मुकण्याची शक्यता आहे. यातून बरा झालाच तर अखेरच्या दोन सामन्यांत तो खेळू शकेल, असे सांगण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडकरिता ही मालिका महत्त्वाची समजली जात आहे. ही स्पर्धा आता तोंडावर आलेली असताना इंग्लंड क्रिकेट मंडळ बटलरबाबत धोका पत्करणार नाही.

हेही वाचा: Sanju Samson : आधी T20 वर्ल्डकपसाठी डावलले आता गळ्यात कर्णधारपदाची माळ

इंग्लंड संघासोबत असलेल्या वैद्यकीय टीमच्या सल्ल्यानुसार बटलरबाबत पुढची कार्यवाही करण्याचा इंग्लंड मंडळाने निर्णय इंग्लंड बोर्डाने घेतला आहे. परिणामी मोईन अली पाकविरुद्धच्या या मालिकेत नेतृत्व करण्याची शक्यता आहे. मालिकेतील पहिले चार सामने कराचीत होत असून उर्वरित लढती लाहोरमध्ये पार पडतील.

इंग्लंडचा संघ कराचीत दाखल झाल्यावर बटलरने कर्णधार या नात्याने पत्रकार परिषदही घेतली आहे, पण आज त्याच्या दुखापतीचे वृत्त प्रसिद्ध झाले. पाकिस्तान मंडळाबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी ही मालिका खेळणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी सांगितले. ही दुखापत गंभीर नाही, पण त्यावर अधिक ताण न देणे महत्त्वाचे आहे. विश्वकरंडक स्पर्धा काही दिवसांवर आलेली असताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे त्याने स्पष्ट केले.

हेही वाचा: Duleep Trophy : व्यंकटेश अय्यरला लागला चेंडू, मैदानात बोलावली रूग्णवाहिका

या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ विश्वकरंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे; पण स्पर्धेपूर्वी त्यांचे दोन सराव सामने आहेत. हे सामने तंदुरुस्ती तपासण्यासाठी महत्त्वाचे असते. पण त्या अगोदरच मी तंदुरुस्त झालो तर पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या दोन सामन्यांत खेळू शकेन, पुढील आठडव्यातच निश्चित कळू शकेल, असे बटलर म्हणाला.

पाकिस्तानच्या दौऱ्यावर आम्ही प्रदीर्घ काळानंतर आलो आहोत, त्यामुळे ही मालिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे, म्हणूनच तंदुरुस्त झालो तर अखेरच्या दोन सामन्यांत खेळण्याची माझी इच्छा आहे, असेही त्याने सांगितले.

टी-२० मालिका

पाकिस्तान - इंग्लंड यांच्यामध्ये सात टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. २० सप्टेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून २ ऑक्टोबरला अखेरची लढत होणार आहे.

Web Title: England Captain Jos Buttler To Miss The Entire Seven Match T20i Series Against Pakistan Beginning On September 20 Due To A Calf Injury

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..