England Cricket Legend Hugh Morris Dies at 62
esakal
Hugh Morris Death: इंग्लडचे माजी क्रिकेटपटू तथा इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे (ECB) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यू मॉरिस यांचं निधन झालं आहे. ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांना आतड्यांचा कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ग्लॅमॉर्गन क्रिकेट क्लबने रविवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.