esakal | POKमध्ये क्रिकेट लीगचे आयोजन; शाहिद आफ्रिदी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
sakal

बोलून बातमी शोधा

kpl

नेहमीच काश्मिरचा जप करणाऱ्या पाकिस्तानने आता क्रिकेट क्षेत्राला राजकारणाचा भाग बनवले आहे. पाकिस्तान आपल्या ताब्यात असणाऱ्या काश्मीरमध्ये (POK) काश्मीर प्रीमियर लीग टी-20 (kashmir premier league) आयोजित करणार आहे

POKमध्ये क्रिकेट लीगचे आयोजन; शाहिद आफ्रिदी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नेहमीच काश्मिरचा जप करणाऱ्या पाकिस्तानने आता क्रिकेट क्षेत्राला राजकारणाचा भाग बनवले आहे. पाकिस्तान आपल्या ताब्यात असणाऱ्या काश्मीरमध्ये (POK) काश्मीर प्रीमियर लीग टी-20 (kashmir premier league) आयोजित करणार आहे. 6 ते 16 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंसह काही माजी परदेशी स्टार खेळाडूही झळकणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आहे. (Pakistan cricket politics Organizing Kashmir Premier League in POK)

संपूर्ण जगात प्रसारण होणार असल्याचा दावा

पाकिस्तानने सांगितलंय की, या लीगचे प्रसारण संपूर्ण जगामध्ये होणार आहे. या लीगमध्ये स्टॅलियन, मीरपूर रॉयल्स, मुजफ्फराबाद टायगर्स, ओव्हरसीज वॉरियर्स, कोटली लायन्स आणि रावलकोट हॉक्स या संघांचा समावेश आहे. पाकने बळाकवलेल्या काश्मीरमध्ये हे सामने सुरु केले जाणार आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षिकेवर आली कचरा उचलण्याची वेळ

कोणते परदेशी खेळाडू घेणार सहभाग

काश्मीर प्रीमियर लीगमध्ये श्रीलंकेचा माजी स्टार तिलकरत्ने दिलशान, इंग्लंडचे माजी खेळाडू मॅट प्रायर आणि मोंटी पनेसर, हर्शल गिब्स भाग घेतील. पाकिस्तानचा दावा आहे की, आणखी काही परदेशी स्टार स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. पाकिस्तानी खेळाडूंमध्ये शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, मोहम्मद हाफीज, सोहेल तनवीर, शादाब खान, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शर्जील खान, खुळदिल शाह, मोहम्मद इरफान या खेळाडूंचा समावेश आहे.

हेही वाचा: लस डेल्टा व्हेरियंटवर आठ पट कमी प्रभावी; संशोधकांचा दावा

मुजफ्फराबादमध्ये होणार सामने

काश्मीर प्रीमियर लीगच्या आयोजकांनी सांगितलं की, मुजफ्फराबादमध्ये असणाऱ्या क्रिकेट स्टेडियममध्ये सर्व सामने आयोजित केले जातील. या सामन्यांबाबत भारताकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. काश्मीरवर भारताची भूमिका स्पष्ट आहे. पीओकेसह गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा भाग आहे. पाकिस्तानने या भागांवर अनधिकृतपणे कब्जा केला आहे.

loading image