esakal | खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची; पाकमध्ये खेळण्यास इंग्लंडचा नकार
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Cricket Team

खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची; पाकमध्ये खेळण्यास इंग्लंडचा नकार

sakal_logo
By
सुशांत जाधव

पाकिस्तान क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नियोजित पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. खेळाडूंची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असल्याचे सांगत दौरा रद्द करण्याचा निर्णय इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला. यापूर्वी न्यूझीलंड संघाने पाकिस्तानमध्ये पोहचल्यानंतर सुरक्षितेतेच्या कारणास्तव दौरा रद्द करुन मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. (England Cricket Team Canceled The Pakistan Tour)

न्यूझीलंडच्या या भूमिकेनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर इंग्लंडनेही पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. इंग्लंडची पुरुष आणि महिला क्रिकेट संघ आक्टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होते. तीन दिवसांपूर्वी न्यूझीलंडने सुरक्षिततेच्या कारणास्तव स्पर्धा रद्द केली होती. पाकिस्तानमध्ये सुरक्षेची चाचपणी करण्यासाठी इंग्लंड आणि न्यूझीलंडने एकाच सुरक्षा टीमसोबत करार केला होता.

हेही वाचा: IPL 2021: KKR नं RCB ची झोप उडवून गाजवली रात्र!

13 आणि 14 आक्टोबर रोजी इंग्लंडचा महिला आणि पुरुष संघ पाकिस्तानमध्ये दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार होता. हे सर्व सामने रावळपिंडीच्या मैदानात नियोजित होते. दोन टी-20 सामन्यानंतर पुरुष संघ मायेदशी परतणार होता तर इंग्लंड महिला संघ आणि पाकिस्तानी महिला संघ यांच्यात 17 ते 21 आक्टोबर दरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार होती.

हेही वाचा: IPL 2021 : युवा पोरानं विराटला गंडवलं; व्हिडिओ एकदा बघाच

खेळाडूंची सुरक्षा सर्वात महत्त्वाची

ECB ने च्या निवेदनानुसार, आम्ही पाकिस्तान दौऱ्यासाठी पुरुष आणि महिला दोन्ही संघ पाठवणार होता. पण सध्याची परिस्थिती अनुकूल वाटत नाही. खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळेच दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ईसीबीने म्हटले आहे.

loading image
go to top