esakal | इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे निधन, भारतात झाला होता जन्म
sakal

बोलून बातमी शोधा

robin jackman

गेल्या 8 वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. 2012 मध्ये त्यांना घशाचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं.

इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे निधन, भारतात झाला होता जन्म

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लंडन - भारतात जन्मलेल्या इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रॉबिन जॅकमन यांचे शुक्रवारी रात्री वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. प्रसिद्ध समालोचक रॉबिन जॅकमन हे गेल्या 8 वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. 2012 मध्ये त्यांना घशाचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. स्वरयंत्रातील धोकादायक असा ट्युमर काढल्यानंतर दोनवेळा त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. 

रॉबिन जॅकमन यांच्या निधनाआधीच इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जॉन एडरिक यांचेही निधन झाले होते. रॉबिन आणि जॉन हे दोघेही सरेकडून खेळत होते. रॉबिन जॅकमन यांच्या निधनाची माहिती आयसीसीने ट्विटरवरून दिली. आयसीसीने म्हटलं की, महान समालोचक आणि इंग्लंडचे माजी गोलंदाज रॉबिन जॅकमन यांचे निधन झाले. या दु:खाच्या प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे. 

रॉबिन जॅकमन यांचा जन्म हिमाचलमधील शिमला इथं झाला होता. जॅकमन यांनी इंग्लंडकडून चार कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत जॅकमन यांनी 33 बळी घेतले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी मार्च 1981 मध्ये पहिली कसोटी खेळली होती. तसंच वयाच्या 36 व्या वर्षी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली होती. 

क्रीडा विषयक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा SakalSports.com

जॅकमन यांनी वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलं होतं. त्यात जॅकमन यांनी 399 सामने खेळताना 22.80 च्या सरासरीने 1402 गडी बाद केले होते. याशिवाय 5 हजार 681 बळीही घेतले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी बराच काळ समालोचक म्हणून काम केलं.