विश्वविजेता इंग्लंड संघ आयर्लंडसमोर 85 धावांत गारद

England gets all out in 85 against Ireland
England gets all out in 85 against Ireland

लंडन : बरोबर दहा दिवसांपूर्वी न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडने विश्वकरंडकावर आपले नाव कोरले होते. त्या आनंदातून इंग्लंडचे चाहते बाहेर येत नाहीत तोच इंग्लंडने आयर्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात अत्यंत खराब फलंदाजी करत सर्वांची घोर निराशा केली आहे. त्यांचा डाव केवळ 85 धावांत आटोपला. 

ऍशेस मलिकेला सुरवात होण्याआधी इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात कसोटी सामना होत आहे. या सामन्यात जगज्जेत्या इंग्लंडचा डाव 85 धावांत आटोपला. आयर्लंडने त्यांना केवळ 23.4 षटकांतच गुंडाळले. चार दिवसाच्या कसोटीत उपाहारापूर्वीच त्यांचा डाव आटोपला. ही इंग्लंडची पाचव्या क्रमांकाची सर्वांत छोटी खेळी आहे. 

विश्वकरंडकात हिरो ठरलेल्या जेसन रॉयने आजच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले मात्र, त्याला केवळ पाच धावा करता आल्या. इंग्लंडकडून केवळ तीन फलंदाजांनी दुहेरा धावसंख्या केली तर तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.  

इंग्लंडच्या सर्वांत छोट्या खेळी

15.4 : विरूद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न क्रिकेट ग्राउंड :1902
19.1 : विरूद्ध वेस्ट इंडिज : पोर्ट ऑफ स्पेन : 1994
20.4 : विरूद्ध न्यूझीलंड : ऑकलँड : 2018
22.5 : विरूद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न क्रिकेट ग्राउंड : 1904 
23.4 : विरूद्ध आयर्लंड : लॉर्ड्स : 2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com