T20 WC : इंग्लंडचा ड्रेसिंग रूममध्ये हातात बाटली घेऊन धुमाकूळ! व्हिडिओ होतेय व्हायरल

मोईन अली आणि आदिल रशीदने स्टेजवरून उतरल्यानंतर इंग्लंडच्या संघाने जोरदार शॅम्पेन उडवून विजय साजरा केला. काय असेल कारण...
England Team Victory Celebration
England Team Victory Celebrationsakal

England Team Victory Celebration T20 World Cup 2022 : जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने इतिहास रचला आहे. या संघाने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. यावेळी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. तसेच पाकिस्तानचे दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. इंग्लंडने फायनल जिंकल्या नंतर ड्रेसिंग रूम मध्ये खेळाडूंनी शॅम्पेन उडवून आनंद साजरा केला. पण दरम्यान, इंग्लंड संघाचा असाच आजुन एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

England Team Victory Celebration
Shoaib Akhtar : तोंड पाडून रडत शोएब म्हणतो... 'इंशाअल्लाह भारतात वर्ल्ड कप...'

कर्णधार जोस बटलर आणि इतर खेळाडूंनी विजयानंतर ट्रॉफीसोबत फोटो काढली. यादरम्यान स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली आणि आदिल रशीदही इंग्लंड संघासोबत व्यासपीठावर सहभागी होते. पण फोटो काढल्यानंतर शॅम्पेन उडवून सेलिब्रेशनची वेळ येताच इंग्लंडचा संघ काही वेळ थांबला. मोईन अली आणि आदिल रशीदने स्टेजवरून उतरल्यानंतर इंग्लंडच्या संघाने जोरदार शॅम्पेन उडवून विजय साजरा केला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.

इंग्लंड संघात अशा घटना यापूर्वी अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. गेल्या वर्षीही ऑस्ट्रेलियन संघात अशीच घटना पाहायला मिळाली होती. त्यानंतर अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही त्याचा सहकारी उस्मान ख्वाजाची बाजू घेतली. जेणेकरून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत. सर्व धर्मांचा आदर केल्या जाईल. यानंतर शॅम्पेन घेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com