Shoaib Akhtar : तोंड पाडून रडत शोएब म्हणतो... 'इंशाअल्लाह भारतात वर्ल्ड कप...'

काही हरकत नाही पाकिस्तान! खूप त्रास होतोय पण मी तुमच्यासोबत उभा....
Shoaib Akhtar
Shoaib Akhtarsakal

Shoaib Akhtar : टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. इंग्लंड संघाच्या या विजयानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने तुटलेल्या मनाने एक व्हिडिओ पोस्ट केला. शोएब अख्तरने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'पाकिस्तान संघाने विश्वचषक गमावला आहे, पण पाकिस्तान संघ खूप चांगला खेळला. पाकिस्तान संघ आधी कुठेच नव्हतास आणि नंतर फायनल खेळला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनो तुम्ही उत्तम कामगिरी केली, संपूर्ण विश्वचषकात तुम्ही उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला अंतिम फेरीत नेले.

Shoaib Akhtar
Yuvraj Singh: युवीने ENG चॅम्पियन झाल्यावर केलं अनोखं विधान! 'ससुराल वालों...'

शोएब अख्तर पुढे म्हणाला, 'नशीबही होते पण, पाकिस्तानने चांगला खेळ करून अंतिम फेरी गाठली. शाहीन आफ्रिदीची दुखापत टर्निंग पॉइंट होता. तरीही काही हरकत नाही. बेन स्टोक्सने 4 षटकार खाऊन 2016 च्या विश्वचषकात पूर्णपणे हरवले होते पण आज 2022 मध्ये त्याने विश्वचषक जिंकला.

Shoaib Akhtar
Blog | T20 WC 22 : भरल्या 'पोटा'वर क्रांती होत नसते; बाबर लढून हरला, रोहितचं काय?

पुढे बोलताना शोएब अख्तर म्हणातो की, 'काही हरकत नाही पाकिस्तान, मी तुमच्यासोबत उभा आहे. काळजी करण्याची गरज नाही. खूप त्रास होतोय पण तुम्ही खूप छान खेळला. निराश झालो पण तरीही आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. इंशाअल्लाह आता भारतात विश्वचषक जिंकेल.

अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 137 धावाच करू शकला. सॅम करनने 4 षटकात 12 धावा देत 3 बळी घेतले, तर आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डनने 2-2 बळी घेतले. बेन स्टोक्सच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर इंग्लंडने 19 षटकांत धावांचा पाठलाग केला. सॅम करन सामनावीर आणि टूर्नामेंटचा सामनावीर ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com