IND vs PAK T20WC22 : इंग्लंडच्या बार्मी आर्मीला आलीये मस्ती! म्हणतात, India Vs Pakistan हे काय आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

England The Barmy Army Controversial Tweet About India Vs Pakistan Cricket Rivalry

IND vs PAK T20WC22 : इंग्लंडच्या बार्मी आर्मीला आलीये मस्ती! म्हणतात, India Vs Pakistan हे काय आहे?

India Vs Pakistan T20 World Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना आज (दि. 23) ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र इंग्लंडचा अधिकृत फॅनक्लब बार्मी आर्मीने एक ट्विट करून खोडसाळपणा केला आहे. यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया देत बार्मी आर्मीला चोख प्रत्युत्तर दिले.

बार्मी आर्मीने मेलबर्न येथे होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी एक ट्विट केले. बार्मी आर्मी म्हणते की, 'भारत विरूद्ध पाकिस्तान काय आहे? याबद्दल कधी ऐकलं नाही.' बार्मी आर्मीने एकप्रकारे भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

यावर एका क्रिकेट चाहत्यांने इंग्लंडमधील अस्थिर राजकीय परिस्थितीवरून टोमणा मारला. तो म्हणाला की, 'इंग्लंडमध्ये स्थीर सरकार तरी आहे काय?' तर दुसऱ्याने 'जास्त काळजी करू नका हे क्रिकेटबाबत आहे तुम्हा लोकांना याबद्दल माहिती नाही.'