esakal | IND vs ENG : कपिल पाजींना मागे टाकत बुमराहची फास्टर सेंच्युरी!
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah

IND vs ENG : कपिल पाजींना मागे टाकत बुमराहची फास्टर सेंच्युरी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs India 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. मुंबईकर शार्दूल ठाकूरनं सलामीची जोडी फोडल्यानंतर जड्डू आणि यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. पहिल्या डावात 81 धावांची आश्वासक खेळी करणाऱ्या ओली पोपला अवघ्या 2 धावांवर तंबूचा रस्ता दाखवत जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये मैलाचा पल्ला गाठला.

त्याने कसोटीतील 100 विकेट्सचा टप्पा गाठला. 24 व्या कसोटी सामन्यात त्याने हा पल्ला पार केला आहे. भारताच्या जलदगती गोलदाजांमध्ये सर्वात जलदगतीने शंभर विकेटचा टप्पा पार करण्याचा विक्रम आता बुमराहच्या नावे झाला आहे. भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांचा विक्रम मागे टाकत बुमराहने नवा विक्रम प्रस्थापित केला. कपिल पाजींनी 25 कसोटी सामन्यात 100 बळी मिळवले होते.

हेही वाचा: Wicket please! जड्डूच्या बॉलिंग वेळी 'टाईट फिल्डिंग'

हेही वाचा: अजिंक्य रहाणेच्या बॅटिंग फॉर्मबद्दल कोच राठोड म्हणतात...

इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामना ज्या मैदानात सुरु आहे त्या ओव्हलच्या मैदानाला शंभरीचा इतिहास आहे. क्रिकेटमधील लॉर्ड्सचे मैदान आणि ओव्हलच्या मैदानात शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळल्याचा खास विक्रम आहे. इंग्लंडमधील या दोन मैदानाशिवाय ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या मैदानात शंभरहून अधिक कसोटी सामने खेळवले गेले आहेत. त्यामुळेच शंभरीचा इतिहास असणाऱ्या मैदानात बुमराहने खास शंभरी साजरी केलीये, असेच म्हणावे लागेल.

loading image
go to top