Cricket Record | भारत - इंग्लंड सामन्यात रेकॉर्ड अन् माईलस्टोनचा 'पाऊस'

England Vs India 5th Test Plenty Records Mile Stones Made By Both Teams
England Vs India 5th Test Plenty Records Mile Stones Made By Both Teamsesakal

बर्मिंगहम : इंग्लंडच्या जो रूटने नाबाद 142 धावा तर जॉनी बेअरस्टोने नाबाद 114 धावा करत इंग्लंडला पाचव्या कसोटीत विजय मिळवून दिला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 269 धावांची भागीदारी रचली. या विजयामुळे इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली. पाचव्या कसोटीत अनेक विक्रम आणि माईल स्टोन पार झाले आहेत. (England Vs India 5th Test Plenty Records Mile Stones Made By Both Teams)

England Vs India 5th Test Plenty Records Mile Stones Made By Both Teams
ENG vs IND | टीम इंडियाचा घाबरून बचावात्मक पवित्रा : रवी शास्त्रींचा दावा

- पाचव्या कसोटी भारताच्या ऋषभ पंतने 146 आणि 57 धावा केल्या. तर रविंद्र जडेजाने 104 आणि 23 धावा केल्या. या दोघांनी सामन्यात 330 धावा केल्या. भारताने पहिल्या डावात 416 आणि दुसऱ्या डावात 245 धावा केल्या. भारताच्या एकूण धावसंख्येच्या निम्या धावसंख्या या पंत आणि जडेजाने मिळूनच केल्या.

- पंत आणि जडेजाने पहिल्या डावात 222 धावांची भागीदारी रचली. ही भारतासाठी विदेशात सहाव्या विकेटसाठी केलेली संयुक्तरित्या सर्वात मोठी भागीदारी ठरली. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझहरूद्दीन यांच्या 1997 च्या रेकॉर्डशी बरोबरी केली. त्यांनी केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ही खेळी केली होती.

- पंत - जडेजाबरोबरच जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी देखील इंग्लंडच्या धावांमधील निम्मा वाटा उचलला. बेअरस्टोने पहिल्या डावात 106 आणि दुसऱ्या डावात 114 धावा केल्या. तर जो रूटने पहिल्या डावात 31 आणि दुसऱ्या डावात 142 धावा केल्या. या दोघांनी इंग्लंडच्या 662 धावांमधील 393 धावा केल्या.

- पंतने पहिल्या डावात 89 चेंडूत शतक ठोकले. हे कसोटीत एका विकेटकिपर बॅट्समनने ठोकलेले सर्वात वेगवान शतक ठरले.

- याचबरोबर ऋषभ पंत इंग्लंडविरूद्ध इंग्लंडमध्येत पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकणारा पहिला विकेटकिपर बॅट्समन ठरला.

- ऋषभ पंतने सामन्यात एकूण 203 धावा केल्या. एजबेस्टनमध्ये एका भारतीय फलंदाजाकडून एका कसोटीत केलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. यापूर्वी विराट कोहलीने 2018 मध्ये पहिल्या डावात 149 तर दुसऱ्या डावात 51 धावा करत 200 केल्या होत्या.

- इंग्लंडने चौथ्या डावात आतापर्यंत कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या (378) चेस केली. यापूर्वी त्यांनी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 359 धावा चेस केल्या होत्या.

- भारताविरूद्ध कसोटीत सर्वाधिक धावा चेस करण्याचा मान इंग्लंडने पटकावला.

England Vs India 5th Test Plenty Records Mile Stones Made By Both Teams
Jasprit Bumrah | मालिका विजयाची संधी हुकल्यानंतर बुमराहने फलंदाजीवर ठेवले बोट

- याचबरोबर एजबेस्टन कसोटीत आतापर्यंत सर्वात मोठी धावसंख्या चेस करण्याची कामगिरी देखील इंग्लंडने करून दाखवली. यापूर्वी 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकने इंग्लंडविरूद्ध 281 धावा चेस केल्या होत्या.

- जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 68 धावात 3 विकेट घेतल्या. त्यानंतर जसप्रीत बुमराह भारताकडून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने मालिकेत 23 विकेट घेत जसप्रीत बुमराहचा 2014 मध्ये घेतलेल्या 19 विकेट्सचा विक्रम मागे टाकला.

- बुमराहने या कसोटीत पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा केल्या. त्यात बुमराहचा 29 तर वाईड, बाईज आणि नो बॉलचा वाटा 6 धावांचा होता. जसप्रीत बुमराहने कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडला. लाराने एका षटकात 28 धावा चोपल्या होत्या.

- एजबेस्टन भारतासाठी कायम अनलकी ठरले आहे. या ठिकाणी भारताला आतापर्यंत एकही कसोटी जिंकता आलेली नाही. आतापर्यंत या मैदानावर झालेल्या 8 सामन्यातील 7 सामने गमावले आहे. एक कसोटी अनिर्णित राहिली आहे.

- इंग्लंड आणि भारत आता पतौडी ट्रॉफीचे संयुक्त विजेते ठरले आहेत. भारताने 2007 मध्ये राहुल द्रविडच्या कॅप्टन्सीखाली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकता आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com